Pune Airport will be close for 15 days for runway repairing  Dainik Gomantak
महाराष्ट्र

पुणे विमानतळ 15 दिवसांसाठी बंद, प्रवाशांचा संताप

विमानतळ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पुण्यातील लोहगाव विमानतळावरून (Pune Airport) उड्डाणे 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान बंद राहतील.

दैनिक गोमन्तक

पुणे लोहगाव विमानतळ (Pune Airport) 15 दिवस बंद राहणार आहे. विमानतळ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पुण्यातील लोहगाव (Lohegaon) विमानतळावरून उड्डाणे 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान बंद राहतील. विमानतळावरील धावपट्टीची डागडुची करण्याच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळ प्राधिकरणाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. आता ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट घेतले आहे त्या साऱ्यांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे . आणि इतर आणखी प्रवाशांनाही कुठेही जाण्यासाठी मुंबईहून विमान घ्यावे लागणार आहे.(Pune Airport will be close for 15 days for runway repairing)

सप्टेंबर 2020 मध्ये हवाई दलाने लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीची दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. विमानतळाच्या मुख्य भागाचे काम 26 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे . तेव्हापासून लोहगाव येथून रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत उड्डाणे बंद होती. यामुळे जवळजवळ वर्षभर लोहगाव येथून दिवसा उड्डाणे सुरू झाली आहेत. आता ही उड्डाणेही थांबणार आहेत. विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत येथून एकही उड्डाण होणार नाही.

विमानतळ बंद करण्याची घोषणा अवघ्या 10 दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. यामुळे, ज्या प्रवाशांनी 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान तिकीट बुक केले आहे त्यांना आता समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या निर्णयाबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लॉकडाऊन काळात रात्री उड्डाणे बंद करण्यात आली. त्यावेळी हजारो प्रवाशांना त्यांची तिकिटे रद्द करावी लागली होती.

प्रशासनाने दुरुस्तीचा एवढा मोठा निर्णय अचानक तर घेतला नसावा ना असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत. जर हा निर्णय अगोदरच घेतला गेला असेल तर तिकीट बुकिंग का करण्यात आले? जर हा निर्णय अचानक घेण्यात आला असेल तर तो का घेतला गेला? आधी नियोजन का केले नाही? याबाबत प्रवाशांना अगोदरच माहिती का दिली गेली नाही? असा सवाल सारे प्रवाशी करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT