PM Narendra Modi dainikgomantak
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रोचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार महाराष्ट्रात, ६ मार्चला पुणे दौऱ्यावर

दैनिक गोमन्तक

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला महाराष्ट्रात येत असून त्यांच्या हस्ते येथील मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी सत्ताधारी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली जात आहे. त्यांच्या हस्ते निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचा सत्ताधारी भाजपचा मानस आहे.

तसेच पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते मेट्रोच्या (Metro) फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालयांचे (College) उद्घाटनही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संगमवाडी ते बंडगार्डन नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल. तर पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई-बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन ही केले जाईल.

असा आहे पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा

- पंतप्रधान मोदी यांचे ६ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता लोहगाव विमानतळावर आगमन

- महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रम

- गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनवर मेट्रोच्या उद्घाटनासाठी. तेथून मेट्रोने आनंदनगर स्टेशन कडे रवाना

- कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर सभेला संभोधन करणार

लवळे येथील कार्यक्रमाला हेलिकॉप्टरने (Helicopter) रवाना

- तर दुपारी ३ च्या सुमारास लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT