Exame paper Dainik Gomantak
महाराष्ट्र

मालेगावात पोस्ट कर्मचारी संपावर

संपाचा परिक्षेच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

मालेगाव : केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात देशभरातल्या कामगार संघटनांनी आज आणि उद्या असा दोन दिवस संप पुकारला आहे. यात महाराष्ट्रातून 30 संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले असून यावेळी इतर सरकारी संस्थांसह 16 जलविद्युत प्रकल्पांचे खासगीकरण करू नये अशी मागणीही करण्यात आली आहे. तर यावेळी एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पातील कर्मचारी ही आक्रमक झाले असून त्यांनीही संपात आपला सहभाग नोंदवला आहे. तर या देशव्यापी संपात पोस्ट कर्मचाऱ्यांनीही उडी घेतली असून मालेगावमधील पोस्ट कर्मचारी संघटना सहभागी झाली आहे. याचा परिणाम थेट दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर झाला असून त्यांनी दिलेल्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका या पोस्टात पडून आहेत. ज्यांचा आकडा 50 हजारांपेक्षा जास्त आहे. यामुळे परिक्षेच्या निकालावर याचा परिणाम होणार असून तो लांबण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. (Post employees on strike in Malegaon)

केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगारविरोधी धोरणाच्या विरोधातील नियमांमुळे कर्मचारी संघटनांनी संपाचे हत्यार उपसले असून ते (employees) आजपासून संपावर (strike) जात आहेत. 28 आणि 29 रोजी कर्मचारी संघटनांच्या संपामुळे बँकांवर (Bank) परिणाम दिसेल तर 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपत आल्याने बँकेत सर्वसामान्यांना सेवा मिळणार नाही.

कामगारांसाठी तयार करण्यात लेबर कोड विरोधात कामगार संघटनांनी आवाज उठवला आहे. तसेच कामगार संघटना (Trade union) कोणत्याही कंपनीच्या खासगीकरणाच्या बाजूने नाहीत. सरकारने आपल्या यादीत अनेक सरकारी कंपन्यांचा समावेश केला आहे, ज्यांचे खासगीकरण केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

Zoho Mail: Gmail, Yahoo विसरा आता देशी ई-मेल वापरा; झोहोवर वैयक्तिक आणि बिझनेस मेल कसा तयार कराल? Step By Step प्रोसेस

SCROLL FOR NEXT