Politics  Dainik Gomantak
महाराष्ट्र

गोव्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा महाराष्ट्रातून दारूगोळा

'टीम फडणवीस' मध्ये राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील सहभागी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दैनिक गोमन्तक

Politics: गोवा विधानसभा निवडणुकीकडे भाजपचे बारीक लक्ष आहे. कुठल्याही परिस्थितीत भाजपला गोव्याचा (Goa) गड राखायचा आहे. यासाठी लागणाऱ्या रणनीतीच्या आखणीची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांची प्रभारी म्हणून निवड झाली आहे.

त्यांच्या मदतीला माजी मंत्री व मावळचे माजी आमदार बाळा भेगडे पुढे आले आहेत. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील अनुभवाचा वापर करुन गोव्यातही विजय मिळवू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मंगळवेढा पोटनिवडणुकीत विजय मिळवला. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत त्यांना गोव्याची जबाबदारी दिली आहे. या 'टीम फडणवीस' मध्ये राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) देखील सहभागी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. उर्वरित नेत्यांची नावे येत्या काही दिवसात जनतेसमोर येतील. दरम्यान, फडणवीस व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी गोवा निवडणुकीबाबत राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची 'व्हर्च्युल मिटिंग' काल घेतली.

पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष येथे चांगली कामगिरी करेल, अशी प्रतिक्रिया भेगडे यांनी दिली. फडणवीस, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ यांच्या नेतृत्वाखाली प्रचार केला जाईल. महाराष्ट्रातील मोठे नेते आणि कार्यकर्ते प्रचारासाठी गोव्यात दाखल होतील. मी या महिन्याच्या अखेरीसच गोव्याला जाऊन तेथील परिस्थितीचाआढावा घेणार आहे, असे देखील भेगडे म्हणाले.

फडणवीसांच्या टीम मधील प्रत्येकाला गोव्यातील काही मतदारसंघाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 13 आमदार निवडून आले. नंतर आणखी 10 आमदारांनी पक्षात प्रवेश केला. चार इतर व अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला. या सर्व जुळवा जुळवीमुळे पक्षाला 27 आमदारांचे पाठबळ मिळाले व ते सत्तेत आले. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष `मगोप`ने त्यांची आता साथ सोडलेली आहे. दमदार प्रचार करण्यासाठी भाजपने महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांना गोव्याकडे रवाना केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT