अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस  Dainik Gomantak
महाराष्ट्र

PM Modi in Pune: PM मोदींच्या सभेत अजित पवारांचा राज्यपालांना टोला

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज महाराष्ट्रातील पुण्याला भेट दिली आणि त्यांनी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले यासोबतच पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचेही पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण केले आहे. अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) एमआयटी (MIT) येथील कार्यक्रमासाठी उपस्थित सभेत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शेजारी शेजारी बसले होते त्यावेली या दोन विरोधी पक्ष नेत्यांमध्ये बराच वेळ गप्पा रंगल्याचे दिसून आले.पुणे

यावेळी महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या तमाम जनतेच्यावतीने पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. अजित पवार म्हणाले, 'पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद दिली पाहिजे. ठराव झाल्यानंतर बारा वर्षानंतर मेट्रो सुरु झाली. पुणेकरांना मेट्रोच्या कामामुळे खूप त्रास सहन करावा लागला म्हणून पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम तसेच आणखी काही काळाकरिता तो सहन करावा लागेल. 2006 ला भूमिपूजन आणि 2014 मध्ये मनमोहन सिंगाच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन झाले होते. यावेळी रखडलेल्या पुणे मेट्रो कामावरुन अजित दादांनी भाजप नेत्यांना आणि अप्रत्यक्षपणे मोदींनाही टोला लगावला आहे.

पुणे मेट्रोच्या या उद्घाटनावर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली होती. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पाच किलोमीटरच्या मार्गाचं उद्घाटन मोदींच्या (Narendra Modi)हस्ते झाले आहेत. मोदींच्या स्वागतासाठी भाजपने शहर परिसरात फलक लावले आहेत. तर मोदींना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने (NCP) उपहासात्मक फलक लावून मोदींच्या पुणे दैाऱ्याची खिल्ली उडवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT