Petrol-diesel prices rise again in Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका

जाणून घ्या आज मुंबई, पुण्यासह सर्व शहरांमध्ये इंधन कितीने महागले

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र: सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या पाच दिवसांत आज चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. म्हणजेच आज पुन्हा इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्यातही पेट्रोल आणि डिझेल महाग झाले. तसेच, पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे राहिलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा (Maharashtra) समावेश झाला आहे. (Petrol-diesel prices rise again in Maharashtra)

आज महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर

  • मुंबई

देशातील सर्व राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबई शहरात आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 113.35 रुपये तर डिझेलचा दर 97.55 रुपयांवर पोहोचला आहे. तर नवी मुंबईत आज पेट्रोल 113.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.55 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

  • पुणे

पुण्यात (Pune) आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 112.87 रुपये तर डिझेलचा दर 95.64 रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर नाशिकमध्ये आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 113.74 रुपये तर डिझेलचा दर 96.45 रुपये प्रतिलिटर आहे.

  • नागपुर

आज नागपुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 113.06 रुपये तर डिझेलचा दर 95.85 रुपये प्रतिलिटर आहे. कोल्हापुरात आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 113.42 रुपये तर डिझेलचा दर 96.20 रुपये प्रतिलिटर आहे.

घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल फोनवरून एसएमएस पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावरून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल, त्यानंतर त्या दिवसाचे नवीनतम दर तुमच्यापर्यंत संदेशाच्या स्वरूपात येतील. हा संदेश पाठवण्यासाठी, तुम्हाला RSP<space> पेट्रोल पंप डीलर कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मुंबईचा इंधन दर जाणून घ्यायचा असेल, तर तुम्ही RSP स्पेस 108412 (मुंबईचा डीलर कोड) लिहून 92249 92249 वर पाठवू शकता. तुम्हाला लगेच एसएमएस मिळेल ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर लिहिलेले असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT