Ajit Pawar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

पेट्रोल डिझेलच्या किमतीत आणखी वाढ होणार कारण..: अजित पवार

दैनिक गोमन्तक

देशात काही दिवसांपासून निवडणूक हंगाम सुरू होता. पाच राज्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. यातील पंजाब वगळता उर्वरीत राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. निवडणुकांचे निकाल स्पष्ट होताच पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. आत्ताच्या तुलनेत पेट्रोल डिझेलच्या किमतीत आणखी वाढ होणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

“पेट्रोलचा दर आणखी वाढणार कारण रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढत आहेत. म्हणूनच राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर करताना सिलेंडर वापरणारा महिला वर्ग, सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या या सगळ्यांचा एक हजार कोटी टॅक्स माफ केला आहे. कोरोनानंतर अर्थसंकल्पामध्ये एक रुपयाची वाढ केली नाही. उलट आम्ही जनतेची मदत करण्याचा प्रयत्न केला आहे," असे पवार म्हणाले.

रशिया (Russia) मोठा तेल उत्पादक देश आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर होत आहे. युद्ध (War) सुरु असल्याने निर्यात केलेल्या कच्च्या तेलापैकी 65 टक्के तेल आंतरराष्ट्रीय बाजारात येत नाही. त्यामुळे जगात तेलाचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 90 डॉलरवरून वाढून 140 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली. सध्याची किंमत 115 डॉलर प्रति बॅरल आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील करासवाडा येथील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

Professional League 2024: स्पोर्टिंग क्लबचा एफसी गोवाला धक्का! स्पर्धेतील सलग तिसरा विजय

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

SCROLL FOR NEXT