Mumbai-Goa Accidents  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञातांकडून प्रवाशांना मारहाण; 4.5 लाखांचे दागिने लुटले

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Akshay Nirmale

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांना अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील दागिने लुटल्याची घटना घडली आहे. महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील आंबिवली येथे हा प्रकार घडला आहे.

मुंबईच्या दिशेने जीपमधून जाणाऱ्या प्रवाशांना मारझोड करत त्यांचे साडेचार लाखांचे दागिने लुटण्यात आले. याप्रकरणी पेण दादर सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून जीप क्र. एमएच ०६ एझेड १४५१ मधून एका कुटुंबातील सहा जण दापोलीवरून बोरिवली मुंबईकडे प्रवास करत होते. पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे वाहन आंबिवली फाट्यानजीक असणाऱ्या हॉटेल साई सहारा येथे आले.

त्यावेळी एका कारमधून आलेल्या तरुणांनी त्यांच्या जीपच्या काचेवर दोन दगड मारून त्यांना शिवीगाळ केली. घाबरलेल्या चालकाने गाडी पुढे नेली असता समोरून तीन वाहनांतून आलेल्या जवळपास १२ ते १५ तरुणांनी त्यांना अडवून मारझोड केली.

शिवीगाळ करून जीपमधील प्रवाशांच्या अंगावरील सुमारे चार लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने खेचून पळ काढला.

जीपमधील घाबरलेल्या प्रवाशांनी पनवेल गाठत स्थानिक पोलिसांना घडलेली हकिगत सांगितली. याप्रकरणी पेण दादर सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित गोळे करत आहेत.

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई-गोवा महामार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते; मात्र रात्री वाहनांवर दगडफेक करत त्यांची लूटमार करण्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

Rohit Sharma: 'मला घरी बोलावलं, अर्धा तास माझ्यासोबत...' रोहित शर्माबाबत स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; सांगितली संपूर्ण कहाणी

GST Collection: गोव्यात पाच महिन्यांत 1,143 कोटींचा जीएसटी जमा; 20,960 सक्रिय करदाते, कॅसिनोंबाबतही मोठी स्पष्टता

Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT