Parambir Singh Dainik Gomantak
महाराष्ट्र

परमबीर सिंग यांना कोर्टाने केले फरार घोषित

महाराष्ट्रातील राजकारण वेगाने बदलू लागले असताना आता मागील काही दिवसांपासून परमबीर सिंग यांना न्यायालयाने फरार घोषित करण्यात आले आहे.

Manish Jadhav

महाराष्ट्रातील राजकारण वेगाने बदलू लागले असताना आता मागील काही दिवसांपासून परमबीर सिंग यांना न्यायालयाने फरार घोषित करण्यात आले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना बुधवारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. गुन्हे शाखेचा अर्ज मंजूर करत न्यायालयाने परमबीर सिंगला फरार घोषित केले. परमबीर सिंग यांना 30 दिवसांत हजर राहण्याचा अल्टिमेटमही देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ते वेळेवर हजर न झाल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेने परमबीर सिंग यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप लावला होता, या प्रकरणात परमबीर सिंग यांना आरोपी बनवल्यापासून ते फरार असून त्यांनी तपास समितीसमोरही हजर देखील झाले नाहीत. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता. या आरोपाच्या तपासात त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र वारंवार फोन करुनही ते समोर आले नाहीत.

परमबीर सिंग हे गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता आहेत

परमबीर सिंग गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांना चौकशी समितीसमोर हजर राहण्यास सांगितले असता, त्यांनी या प्रकरणी अधिक काही बोलायचे नसल्याचे त्यांच्या वकिलाकडून उत्तर पाठवले. त्यांच्याकडे इतर कोणतेही पुरावे नाहीत. अशाप्रकारे गैरहजर राहिल्याने त्यांना फरार घोषित करण्यासाठी गुन्हे शाखेने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने या अपीलला परवानगी दिली. परमबीर सिंग यांना 30 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या 30 दिवसांत ते हजर झाले नाहीत, तर गुन्हे शाखा न्यायालयाकडे त्यांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागणार असून, जप्तीची कारवाई सुरु केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

SCROLL FOR NEXT