Pankaja Munde Dainik Gomanatk
महाराष्ट्र

Pankaja Munde: कॉलेजमध्ये कुणी प्रपोज केले का? पंकजा मुंडे म्हणतात

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadanvis Government) नुकताच विस्तार झाला आहे. या विस्तारात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना स्थान मिळेल अशी चर्चा होती, मात्र त्यांना संधी मिळाली नसल्याने मुंडे समर्थक नाराज आहेत. तसेच, माझी कदाचीत पात्रता नसेल त्यामुळे मंत्रिपद मिळाले नाही अशी टिप्पणी पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी झी मराठी वाहिनीवरील एका कार्यक्रमात हजेरी लावली. सुबोध भावे (Subodh Bhave) सुत्रसंचालन करत असेलेल्या या कार्यक्रमात मुंडे यांना एक भन्नाट प्रश्न विचारण्यात आला.

‘बस बाई बस’ या झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi Bass Bai Bass) प्रसारित होणारा कार्यक्रम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकतेच या कार्यक्रमात पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी हजेरी लावली. आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे देखील या कार्यक्रमात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. यावेळी प्रेक्षक महिलांपैकी एका महिलेने तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का असा प्रश्न विचारला.

पंकजा मुंडे यांनी या प्रश्नाचे हसत उत्तर दिले. पंकजा म्हणाल्या, 'अजिबात नाही, तो सुखद क्षण मला अनुभवताच आला नाही.' पंकजा यांनी दिलेल्या या उत्तराने उपस्थितीत प्रेक्षकांमध्ये चांगलाच हशा पिकला. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT