Pandavakda Dam Dainik Gomantak
महाराष्ट्र

Monsoon Alert: पांडवकडा धरण पावसाळ्यात पर्यटकांसाठी राहणार बंद

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता मान्सुनचा मुक्काम कर्नाटक गोवा बॉर्डरवर आहे.

दैनिक गोमन्तक

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता मान्सुनचा मुक्काम कर्नाटक गोवा बॉर्डरवर आहे. तेव्हा मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत खारघर पांडवकडा धरणाला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात, मात्र यावेळी पावसाळ्यात धरणावर पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पावसाळ्यात होणारे अपघात पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर गेल्या अनेक वर्षांत पावसाळ्यात धरणाच्या जोरदार प्रवाहामुळे अनेकांचे बळी गेले होते. त्यामुळे वनविभागाने जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांना बंदी घातली आहे. (Pandavakda Dam in Maharashtra)

अपघात पाहता धरण बंद

पनवेल परिक्षेत्रातील वनविभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा पावसाळ्यात पांडवकडा धरण (Pandavakda Dam) पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. कारण गेल्या वर्षी जूनमध्ये बंदी असतानाही गोवंडी येथील 21 वर्षीय तरुणाचा धरणात गेल्याने खोल पाण्यात पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षी खारघर पोलिसांनी परिसरात सीआरपीसी कलम 144 लागू केले होते. वनविभागाने पर्यटकांना येथे येण्यास बंदी घातली होती.

पर्यटकांच्या सुरक्षेच्या हिताचा निर्णय

पांडवकडा धरणाकडे जाण्यासाठी खात्रीशीर मार्ग नाही. धरणापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना डोंगर चढून जावे लागते. जो अत्यंत अवघड रस्ता आहे. त्यामुळे येथील नागरिक अपघाताचे बळी ठरतात. असे असले तरी पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायला सगळ्यांनाच आवडतं. तेव्हा पर्यटकांना काही सुरक्षा नियम आणि निर्बंधांसह पावसाळ्यात धरण परिसराला भेट देण्यची परवानगी द्याला हवी असे खारघरचे रहिवासी जसपालसिंग नवल म्हणाले. जेणेकरून इथल्या सुंदर दृश्याचा लोकांना आनंद घेता येईल. आणि इथल्या पर्यटनाला चालना मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Viral Video: थरारक...! जंगल सफारीचा रोमांचक अनुभव, चिडलेल्या गेंड्याचा गाडीवर हल्ला; थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

SCROLL FOR NEXT