Narendra Modi Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra ला मोठा धक्का, वेदांता-फॉक्सकॉननंतर टाटा एअरबस प्रोजेक्ट गुजरातमध्ये!

Tata And Airbus: वेदांता-फॉक्सकॉन समूहाच्या मोठ्या गुंतवणुकीनंतर गुजरातला पुन्हा मोठा प्रकल्प मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

Tata And Airbus: वेदांता-फॉक्सकॉन समूहाच्या मोठ्या गुंतवणुकीनंतर गुजरातला पुन्हा मोठा प्रकल्प मिळाला आहे. टाटा आणि एअरबसने पंतप्रधान मोदींच्या गृहराज्यामध्ये 22,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. टाटा आणि एअरबस येथे लष्करासाठी वाहतूक विमाने तयार करणार आहेत. संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार म्हणाले की, 'देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे, ज्याअंतर्गत कंपनी लष्करात वापरण्यासाठी विमान बनवणार आहे.'

दरम्यान, या प्रकल्पासाठी एकूण 21,935 कोटी रुपये खर्च येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वडोदरा येथे या प्लांटचे उद्घाटन करणार आहेत. गुजरातमध्ये (Gujarat) लवकरच निवडणुका होणार आहेत. या प्रकल्पासाठी सरकार हजारो नोकऱ्यांचे आश्वासनही देत ​​आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, गुजरात सरकारने वेदांता-फॉक्सकॉन समूहासोबत 1,54,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी करार केला होता.

तसेच, वेदांता लिमिटेड आणि तैवानची फॉक्सकॉन संयुक्तपणे गुजरातमध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती करणार आहेत. त्याचा प्लांट अहमदाबादजवळ (Ahmedabad) उभारला जाणार आहे. शासनाबरोबर विजेबाबतही करार झाला आहे. या प्रकल्पासाठी गुजरात सरकार वीजेसह अन्य सुविधा देणार आहे. यातून 1 लाख लोकांना रोजगार मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

दुसरीकडे, टाटा-एअरबस इतर देशांतील लष्कराला आवश्यक उपकरणे आणि तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करत आहे. यामुळे पंतप्रधानांच्या 'मेक इन इंडिया' या महत्त्वाकांक्षी मोहिमेलाही चालना मिळत आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने (Central Government) एअरबसकडून 56 वाहतूक विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. करारानुसार, 16 विमाने लवकरच वितरित केली जातील आणि उर्वरित भारतात (India) तयार केली जातील.

अधिकृत निवेदनानुसार, सप्टेंबर 2023 ते ऑगस्ट 2025 दरम्यान, 16 विमाने देण्यात येतील. त्याच वेळी, गुजरातमध्ये बनवलेले पहिले विमान सप्टेंबर 2026 पर्यंत उपलब्ध होईल. अद्ययावत C 295 विमाने खूप जुन्या असलेल्या Avro विमानांची जागा घेईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: ..होत्याचे नव्हते झाले! किनारे मोकळे, मासेमारी ठप्प, शॅक्समध्ये शुकशुकाट, शेतीचे नुकसान; पावसामुळे गोव्याला मोठा फटका

Panaji Crime: पोलीस स्टेशनसमोरच 2 गटांत राडा! संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी; 3 टॅक्सी, 1 दुचाकी जप्त

Ranji Trophy: गोव्याची फॉलोऑननंतर ‘जिगर’! अभिनव-मंथनची झुंजार भागीदारी; कर्नाटकविरुद्ध लढत अनिर्णित

Montha Cyclone Update: मोंथा वादळाचा 'शालिमार एक्सप्रेस'ला फटका! गोव्यातून सुटली उशिरा; किनारपट्टीजवळील 120 रेल्वेगाड्या रद्द

Roy Naik: 'आपली तयारी, पण पक्षाचा निर्णय अंतिम'! फोंड्यातील पोटनिवडणुकीबद्दल रॉय नाईकांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT