Maharashtra Weather Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Weather: तापमानाचा पारा घसरला, राज्यात थंडीचा तडाखा

Maharashtra Weather News: राज्यात तापमानाचा पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात थंडीचा कडाका पाहायला मिळत आहे. काही दिवसापासून तापमानाचा पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यात तापमान घटले आहे. यामुळे पुन्हा शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी तापमानात बरेच चढ उतार पाहायला मिळत आहे. कधी उष्णता तर कधी पाऊस तर काही तापमानात घट पाहायला मिळत आहे. या सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम पिकांवर आणि मानवी आरोग्यावर (Health) होत आहे. असे असतांना आता पुन्हा राज्यात थंडीत वाढ झाली आहे. राज्यात आज अनेक जिल्ह्यात सकाळच्या किमान तापमानात घट झाल्याचे आढळले. पारा हा 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता हवामान विभागाने शक्यता दर्शवली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेल्या मंदोस चक्रीवादळामुळे राज्यातील थंडी कमी होऊन पाऊस (Rain) आणि ढगाळ वातावरण राज्यात पाहायला मिळाले. मंदोस चक्रीवादळाचा जोर ओसरला असल्याने पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. ही थंडी थंडी या आठवड्यापर्यंत टिकून राहणार आहे.

देशात पूर्वेकडील राज्यात थंडी वादळी आहे. या सोबतच धुके देखील वाढले आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या धुक्यामुळे रेल्वे आणि विमानसेवा प्रभावित झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT