Narayan Rane arrested  Dainik Gomantak
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेले वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना भोवले

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात केलेले वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना भोवले आहे कारण, गोळवली, संगमेश्वर येथून नारायण राणे यांना अटक झालेली आहे. (Narayan Rane arrested)

वास्तविक, नारायण राणे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात विधान केले. या वक्तव्यात ठाकरे यांच्यावर टीका करण्याबरोबरच त्यांना 'कानशिलात' मारण्यापर्यंत बोलले होते. राणे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली होती. त्यानंतर नाशिक पोलीस, पुणे पोलीस राणेंना अटक करण्यासाठी संगमेश्वरला निघाले होते.

नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली असून नारायण राणेंना अटक कऱण्यासाठी पोलीस अधीक्षक गेस्ट हाऊस वरती पोहोचले होते. पण पोलिसांकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांना अटक करुन गाडीतून संग्मेवश्वर पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Srinagar Blast: श्रीनगरमध्ये स्फोटात मोठा खुलासा! 9 ठार, 32 हून अधिक जखमी; दहशतवाद्यांच्या मॉड्यूलशी थेट संबंध

Goa ZP Election: ‘मये’त जिल्हा पंचायत निवडणुकीचे वारे जोरात! फॉरवर्ड, काँग्रेसचे उमेदवार निश्चित; दक्षिण गोव्यात भाजपची चाचपणी

Goa Live News: वृक्षमाता 'पद्मश्री थिमक्का' यांचे वयाच्या '114'व्या वर्षी निधन

Sunil Gudlar Case: सुनील गुडलरला कोर्टाचा दणका! CCTV फुटेज देण्याची मागणी फेटाळली; आरोपपत्र दाखल होईपर्यंत वाट पहावी लागणार

Horoscope: ..आज मिळणार गोड बातमी! 'या' राशींसाठी भाग्याचा दिवस; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT