Mumbai Police Dainik Gomantak
महाराष्ट्र

मनसेसह हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना तात्काळ मुंबई सोडण्याचे आदेश

राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीसांनी घेतली खबरदारी

दैनिक गोमन्तक

मुंबई : राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत पुन्हा भोंगा आणि हनुमान चीलीसा मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्य सरकारला सुनावलं असून राज्यसरकारने याबाबत ताडीने निर्णय घ्यावा अन्यथा समाजात तेढ निर्माण होईल. असं ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली असून पोलिसांनी मनसेसह बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवत कलम 144 लागू केले आहे.

पोलिसांनी नोटीस देत या सर्वांना 2 मे ते 17 मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश जारी केले गेले आहेत. भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत संबधित कार्यकर्त्यांना मुंबईत वावरण्यात किंवा थांबण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मुंबई घाटकोपर ठाण्याच्या हद्दीत ३ मे रोजी साजरी होणाऱ्या ईद सणाच्या काळात आपण मुंबई हद्दीत वावरु नये. कारण आपण मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडवू शकता, असा आदेश यात देण्यात आला आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाची तयारी सुरु केली आहे. नोटीस पाठवल्यानंतरही कार्यकर्ते हनुमान चालीसा पठणाबाबत ठाम असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. राज्यभरातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

3 मे पर्यंत भोंगे उतवरले नाहीत तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी 3 मे रोजी राज्यात महाआरतीचं आयोजन करण्याची सूचनाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केली. या सर्व हालचालींची दखल घेत पोलीसांनी संवेदनशील विषयामूळे राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीसांनी अधिकची खबरदारी म्हणून ही काळजी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT