राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत पुन्हा एकदा भोंगा आणि हनुमान चालीसा या मुद्यावरुन राज्य सरकारला सुनावलं असून राज्यसरकारने याबाबत ताडीने निर्णय घ्यावा अन्यथा समाजात तेढ निर्माण शक्यता आहे. असे ही राज ठाकरे म्हणाले. यावरुन राज ठाकरे यांच्या अटकेची ही शक्यता आहे. त्यामूळे राज्यात राजकिय वातावरण तापलं असून राज्यात आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. (Muslims around the world are victims of violence)
या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि, महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. राज ठाकरे यांनी जर कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावरही कारवाई करतील.” असे ही ते यावेळी म्हणाले आहेत.
यासंदर्भात पुढे बोलताना पटोले म्हणाले की, कोणाच्याही धर्माबद्दल थेट टीका करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्य असून या विचाराचे रक्षण करण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरबाबत जे निर्देश दिले आहेत. त्याचे पालन प्रशासन करेल. कायद्याच्या पुढे जाऊन कोणी भूमिका घेत असेल तर ती महाराष्ट्रात चालणार नाही.
हा विषय राज ठाकरे या व्यक्तीपुरता मर्यादित नाही. कायदा तोडणारा कोणीही असो त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी काँग्रेसने या विषयांवर चर्चा केली आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याबाबत सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी.” असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.