Nitesh Rane

 

Dainik Gomantak

महाराष्ट्र

नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, कणकवली पोलीसांची नोटीस

माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून वकिलांनी पोलीस ठाण्यात माझ्यावतीने बाजू मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली. एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नितेश राणे यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत राणे यांचे नाव घेतले होते.

कणकवली येथील संतोष परब यांनी ही तक्रार नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वी परब हे आपल्या दुचाकीवरून कणकवलीतील नरवडेनाका ते कनेडीकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला नंबरप्लेट नसलेल्या इनोव्हा कारने धडक दिली.

संतोष परब पडल्यानंतर वाहनातील अज्ञात व्यक्तीने तू संतीश सावंत यांचे काम करतोस का, बघतो तुला अशी धमकी देत चाकूने छातीवर वार करत हत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोराने गोट्या सावंत आणि नितेश राणे यांना कळवले पाहिजे असे म्हणत इनोव्हा कारमध्ये बसून पळून गेला. कणकवली पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने आमदार नितेश राणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. कोकणातील शिवसेनेत (Shiv Sena) सध्या अंतर्गत वाद सुरू आहेत. त्यातून लक्ष हटवण्यासाठी माझे नाव गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून वकिलांनी पोलीस ठाण्यात माझ्यावतीने बाजू मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नितेश राणे यांनी मुंबईतील वीर जिजामाता प्राणीसंग्रहालयाचे नाव बदलण्यात आल्याचे ट्वीट केले होते. या ट्वीट प्रकरणी मुंबईतील शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवसैनिकांच्या तक्रारीकडे आपण फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचा टोला ही राणे यांनी लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT