No permission for Rahul Gandhi rally in Mumbai congress in Mumbai high court

 

Dainik Gomantak

महाराष्ट्र

मुंबईत राहुल गांधींच्या सभेला 'नो परमिशन ', काँग्रेस हायकोर्टात

दैनिक गोमन्तक

राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) मुंबईतील रॅलीला परवानगी न दिल्याने काँग्रेसने (Congress) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. काँग्रेसच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. 28 डिसेंबर रोजी मुंबईत राहुल गांधींची (Rahul Gandhi) प्रस्तावित रॅली आहे. काँग्रेसला ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर सभा घ्यायची आहे. प्रशासनाने यासाठी परवानगी दिलेली नाही. यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.(No permission for Rahul Gandhi rally in Mumbai congress in Mumbai high court)

ते म्हणाले, आम्हाला समजत नाही की रॅलीला परवानगी का दिली जात नाही? जर त्यांना कोविडबद्दल काळजी वाटत असेल तर आम्ही त्यांना आमच्या पत्रात आधीच सांगितले आहे की आम्ही कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू. फारसा वेळ शिल्लक नसल्याने परवानगीसाठी कोर्टात जावे लागत असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले आहे.

कोरोना विषाणूच्या Omicron प्रकाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस कडक कारवाई करत आहेत. अलीकडेच, मुंबई पोलिसांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM म) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या रॅलीच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. साबेर आलम आणि इतर चार जणांविरुद्ध शनिवारी रात्री उशिरा साकीनाका पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला, पोलिसांनी सांगितले. चांदिवलीत ओवेसींची सभा झाली. या रॅलीत AIMIM कार्यकर्त्यांसह हजारो लोक सहभागी झाले होते.

येत्या 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. याच दिवशी राहुल गांधी मुंबईत सभा घेणार आहेत. याबाबत काँग्रेसकडून घोषणा करण्यात आली आहे. सरकारने एमआयएमच्या सभेलादेखील परवानगी नाकारली होती. त्यात आता ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. यासाठी पक्षाने आधीच स्वबळाचा नारा देखील दिला आहे आणि हीच महत्वाची निवडणूक डोळ्यसमोर ठेवून काँग्रेसने आपली कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठीच राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.आणि मुंबईतील एक ऐतिहासिक स्थळ म्हणजे शिवतीर्थ येथे ते सभा घेणार आहेत यापूर्वी काँग्रेसने शिवतीर्थावर अनेक सभा घेतल्या. मात्र, राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळाली तर ही शिवतीर्थावरील त्यांची पहिलीच सभा असणार आहे.

तर दुसरीकडे याबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनी कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला होता. 28 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेसाठी आम्ही अद्याप कोणताही पुढाकार घेतलेला नाही, तसेच परवानगी मागण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.असे स्पष्टीकरण दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT