अबू आझमी Dainik Gomantak
महाराष्ट्र

"आघाडी सरकार मध्ये आमचं कोणीचं ऐकत नाही"- अबू आझमी

तसेच अबू आझमी(Abu Azmi) पुढे म्हणाले की, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही आलो आहोत. पुरोगामी विचारांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.आम्हला भेटून आमच्या अडचणीतरी समजून घ्या

दैनिक गोमन्तक

राज्यातील या महाविकास आघाडीत सहभागी असणारा समाजवादी पक्ष(SP ) नाराज असल्याचं बोललं जात आहे.समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी(Abu Azmi ) म्हणाले की, आमची गरज असेल तेव्हाच बोलवू नका, महाराष्ट्रात (Maharashtra) भाजपाचं(BJP) सरकार नको म्हणून आम्ही महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता परंतु या सरकारमध्ये आमचं कोणीही ऐकत नाही. फोन उचलत नाही. बकरी ईदबाबत अद्याप नियमावली काढली नाही. १-२ दिवसांत नियमावली काढू असं म्हणतात. परंतु समाजातील लोकांना बोलावून चर्चा करा आणि नंतर नियमावली काढा असं मी मागणी केली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

तसेच अबू आझमी पुढे म्हणाले की, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही आलो आहोत. पुरोगामी विचारांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.आम्हला भेटून आमच्या अडचणीतरी समजून घ्या असेही अबू झमे यावेळी म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये अनेकदा काही ना काही वाद घडत असतो आगामी निवडणुकाआम्ही स्वबळावर लढू असा सूर अनेकदा काँग्रेसमधून यात असतो एवढाच नवे तर भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार स्वबळाची भाषा करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादीही सावध भूमिका घेत आहेत. मागील काही दिवसात राष्ट्रवादी आणि शवसेना जवळ आलेली पाहायला मिळत आहे. अनेकवेळा राष्ट्रवादीचे अनेक नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटताना दिसतात. तर २ दिवसांपूर्वीच राष्टवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन नेत्यांमध्येही भेट झाली होती.

आता राज्याचा राजकारणाचा विचार करता महाविकास आघाडी सरकार सोमोरच्या अडचणी काही करता कमी होताना दिसत नाही आहेत. आता अबू आझमी यांच्या या विधानाने महाविकास आघाडी सरकारमध्ये नवीन ठिणगी पडताना दिसत आहे . राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासोबतच अनेक घटक पक्षही सहभागी आहेत. पण आता महाविकासआघाडीतील आणखीन एक घटकपक्ष नाराज असल्याने सरकारसमोरील अडचणी वाढणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa News: 'कॅश फॉर जॉब' प्रकरणी दीपश्रीला पुन्हा अटक; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT