Nitin Gadkari speaks about delays in the Mumbai-Goa Highway project Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway: 16 ते 17 वर्षांची रखडपट्टी अन् आता गडकरींचं मोठं विधान; म्हणाले, 'मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्धाटनाला येणार नाही, मला लाज वाटते' VIDEO

Nitin Gadkari Mumbai Goa Highway Delay Reaction: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबद्दल उघडपणे नाराजी आणि खेद व्यक्त केला.

Manish Jadhav

Nitin Gadkari Mumbai Goa Highway Delay Reaction: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबद्दल उघडपणे नाराजी आणि खेद व्यक्त केला. गोव्यातील पर्वरी येथे 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या पायाभरणी व उद्धाटन कार्यक्रमादरम्यान बोलताना गडकरी यांनी थेट सरकारी यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल 16 ते 17 वर्षे लागली, ही अतिशय दुर्दैवी बाब असून इतका प्रदीर्घ वेळ लागल्याने मला स्वतःला प्रचंड लाज वाटत आहे, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

याच कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai-Goa Highway) काम पूर्ण झाल्यावर त्याच्या औपचारिक उद्घाटनाला मी उपस्थित राहणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. कोकण आणि गोव्याला जोडणारा हा महामार्ग महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनवाहिनी मानला जातो. मात्र, या प्रकल्पात अनेक कंत्राटदारांनी दिरंगाई केली आणि ते काम पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. गडकरी म्हणाले की, 'माझ्या मंत्रालयाने आतापर्यंत अनेक जागतिक विक्रम नोंदवले आहेत, परंतु आता एका वर्षात सर्वाधिक कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करुन डीबार करण्याचा आणि निष्काळजी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा नवीन विक्रम करण्याची वेळ आली आहे.'

आता यापुढे कामात कोणताही हालगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा थेट इशाराच त्यांनी दिला. सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम 90 ते 95 टक्के पूर्ण झाले असून, येत्या ऑक्टोबर महिन्यात गडकरी स्वतः मुंबई-गोवा मार्गाने प्रवास करुन या महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

याच कार्यक्रमादरम्यान गडकरी यांनी आपल्या राजकीय भविष्याबाबत सुरु असलेल्या चर्चांनाही पूर्णविराम दिला. देशातील इतर विविध राज्यांमधून आपल्याला निवडणूक लढवण्याच्या अनेक ऑफर्स आल्या असल्या, तरी आपण आपली कर्मभूमी आणि कार्यभूमी सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत पक्षाचा आदेश आणि जनतेचा पाठिंबा आहे, तोपर्यंत नागपूर हा आपला विद्यमान मतदारसंघ सोडण्याचा कोणताही प्रश्न येत नाही, असे सांगत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

याशिवाय, राष्ट्रीय महामार्गांवर होणाऱ्या भीषण अपघातांना आणि निष्पाप लोकांच्या मृत्यूला चुकीचे डीपीआर (Detailed Project Report) बनवणारे अभियंते व सल्लागार जबाबदार असल्याचे सांगत गडकरी यांनी वाहतूक सुरक्षेबाबतही कठोर धोरण अवलंबण्याचे संकेत दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT