Nitesh Rane  Dainik Gomantak
महाराष्ट्र

नितेश राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पत्राद्वारे खरमरीत टीका

नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

दैनिक गोमन्तक

पावसाळ्यात मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचते. परिणामी नागरिकांची गैरसोय होते. या आधीच्या पावसाळ्यात अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. हे थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत सत्तेत असणारी शिवसेना काहीही करू शकलेली नाही, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. (Nitesh Rane writes letter to CM Uddhav Thackeray)

नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. यावर्षी भरपूर पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. तुंबणाऱ्या या मुंबईत 386 असे धोक्याची ठिकाणं आहेत ज्याला आपण फ्लडींग पॉईंटस म्हणतो. यापैकी 28 ठिकाणं एकाच पश्चिम विभागतील आहेत. यावर्षी पावसाळ्यात समुद्राला 22 दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग 250 मिली पेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भिती नितेश राणे यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT