Nitesh Rane  Dainik Gomantak
महाराष्ट्र

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हुतात्म्यांच्या बलिदानाचा विसर पडतोय"

शिवसेना आणि मंत्री नारायण राणे यांच्यातील आरोपांची मालिका संपेना

दैनिक गोमन्तक

मुंबई : नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी हुतात्म्यांच्या बलिदानाचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतोय असं म्हटल आहे. गेले काही दिवस शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद सुरु असुन या वादावर अजूनही पडदा पडलेला नसून आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे.

(Nitesh Rane allegations against Chief Minister Uddhav Thackeray )

नितेश राणे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अस म्हटलंय की, माननीय मुख्यमंत्री महोदय मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 107 मराठी हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं.या हुतात्म्यांच्या बलिदानाचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतोय, कारण शिवाजी पार्क येथे या चळवळीच्या स्मृती स्मरणात राहव्यात यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी करण्यात आली. त्याला आता 30 एप्रिल रोजी 12 वर्षे पूर्ण होतील, परंतु या कलादालनाकडे आपण हेतूपूरस्परपणे दुर्लक्ष करत आहात."

नितेश राणे याबाबत पूढे म्हणतात कि, महाराष्ट्र दिन तोंडावर आलेला असताना, हे कलादान अद्यापही पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले नाही, ना इथे कुठली रंगरंगोटी केली गेलेली नाही. एवढच नाही तर कलादालनावर विद्युत रोषणाई करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करून सहा महिने उलटले तरी कलादालनावर विस्मरणाचा अंधार पडलेला आहे.

उलटपक्षी या कलादालनाचा उपयोग अधिकाऱ्यांच्या पार्किंगसाठी व मिटींगसाठी केला जातोय अशी खदखद त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यामूळे महाराष्ट्रातील राजकिय वातावरण पाहता सध्या शिवसेना ही अॅक्टीव मोडमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामूळे शिवसेना या मूद्याला कसे प्रतिउत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT