Mumbai-Goa Highway Traffic Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway Traffic: न्यू ईयरचं सेलिब्रेशन करुन परतणाऱ्या पर्यटकांचा खोळंबा; मुंबई-गोवा महामर्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

Mumbai Goa Highway: कोकणासह गोव्यात न्यू ईयरचं दणक्यात सेलिब्रेशन करुन मुंबईकडे परतणाऱ्या पर्यटकांना मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

Manish Jadhav

न्यू ईयरच्या स्वागतासाठी मोठ्याप्रमाणावर पर्यटक कोकणासह गोव्यात पोहोचले होते. मात्र आता, कोकणासह गोव्यात न्यू ईयरचं दणक्यात सेलिब्रेशन करुन मुंबईकडे परतणाऱ्या पर्यटकांना मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. माणगाव येथे सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लागल्या आहेत.

माणगाव-गारळ फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी

माणगाव बाजारपेठ ते गारळ फाट्यापर्यंत ही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून या महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

न्यू ईयर सेलिब्रेशन

दरम्यान, थर्टी फर्स्टचा जल्लोष आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणासह गोव्यात पर्यटक पोहोचले होते. ख्रिसमस, सनबर्न आणि थर्टी फर्स्टसाठी मोठ्याप्रमाणावर पर्यटक गोव्यात (Goa) येतात. त्यामुळे 25 डिसेंबरपासून महामार्गावर कोंडी निर्माण होत होती.

दुसरीकडे, वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. वाहतूक कोंडीमुळे या महामार्गावरुन दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचं काम

मागील काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे. अनेक सरकारे आली आणि गेली पण महामार्गाचं काम पूर्ण करण्यात कोणीही स्वारस्य दाखवले नाही. सरकारांनी लवकरात लवकर महामार्गाचे काम पूर्ण होईल असे सांगून केवळ चालढकल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT