अमरावतीत जमावबंदीचे आदेश
अमरावतीत जमावबंदीचे आदेश  Dainik Gomantak
महाराष्ट्र

अमरावतीत पुढील 4 दिवस जमावबंदीचे आदेश

दैनिक गोमन्तक

त्रिपुराच्या घटनेननंतर अमरावतीमध्ये बंद पुकारला गेला होता. या बंदला सकाळी दहा नंतर हिंसक वळण लागले. जमावाकडून दगडफेक करण्यात आली. यानंतर जमावाला पगविण्यासाठी पोलिसांनी (Police) अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली असून अमरावतीत पुढील 4 दिवस कलम 144 लागू करत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

त्रिपुरा (Tripura) घटनेनंतर अमरावतीमध्येही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपा कडून पुकारण्यात आलेला बंद ला सकाळी हिंसक वळण लागले. दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. काल देखील अमरावतीमध्ये त्रिपुरा घटनेच्या विरोधात अनेक मुस्लिम संघटनांडकडून निदर्शने करण्यात आली होती. अमरावतीशिवाय मालेगाव, नांदेडमध्येही निदर्शने झाली.

अनेक ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळण लागल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. आणि याचा निषेध म्हणून हिंदू संघटनांनी शनिवारी अमरावती बंदची हाक दिली होती. मात्र या बंदला अमरावतीत सकाळी वेगळे वळण लागले. त्यामुळे येथे पुढील 4 दिवस कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले असल्याची महिती पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)यांनी दिली आहे.

तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात

सकाळी झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे अमरावतीतील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. दुकाने आणि वाहनांवर आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. यानंतर वातावरण शांत करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे, पाण्याचे फवारे आणि लाठीमार केला.

नांदेडमधील सुद्धा परिस्थिती

शुक्रवारी नांदेड (Nanded) मध्ये देखील हिंसक घटना घडल्या होत्या. परंतु तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. 3 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 3 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही जणांना अटकही करण्यात आली असून इतर 20 जणांची ओळख पटली असल्याची माहिती नांदेड पोलिसांनी दिली आहे.

तसेच, मालेगावातही (Malegaon) आता शांतता आहे. मालेगावामध्ये नियंत्रण मिळवल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही आणि व्हिडिओच्या माध्यमातून आणखी गुन्हेगार पकडले जातील. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

त्रिपुरातील आगीची ज्योत महाराष्ट्रात

अलीकडेच बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात त्रिपुरामध्ये हिंदू संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांदरम्यान मशिदींचे नुकसान झाल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर त्रिपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार उसळला. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही पहायला मिळत आहेत. यामध्ये अमरावती, मालेगाव, नांदेड आदी भागात या हिंसाचार झाल्याचे दिसून आले.

गृहराज्यमंत्री यांचे हिंदू-मुस्लिम संघटनांना आवाहन

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी हिंदू आणि मुस्लिम संघटनांना शांततेचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, अमरावतीमध्ये शांतता राखा. रझा अकादमीवर बंदीची भाजपची मागणी हा भाजपचा अजेंडा आहे, त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, आता यावर काहीही बोलणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल.

आज संपूर्ण राज्यात शांतता आहे. आणि फक्त अमरावतीतच वातावरण बिघडवले जात आहे. हिंदू, मुस्लिम, सामाजिक संघटनांना एकमेकांना मदत करावी असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची चर्चाही झाली आहे.

तसेच अमरावतीचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्याशी चर्चा झाली आहे. गृहमंत्र्यांनी शांततेचेही आवाहन करत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होणार आहे. यातून सर्वकाही समोर येईल. मोर्चा किंवा आंदोलनासाठी कोणत्याही संघटनेला परवानगी देण्यात आली नाही. सोशल मीडियावरून कोणता मेसेज व्हायरल करण्यात आला, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

अमरावती, नांदेड, औरंगाबाद येथील वातावरण

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, 'जे त्रिपुरात घडले नाही, त्याबाबत महाराष्ट्रात होत असलेल्या दंगली पूर्णपणे चुकीच्या आहेत. त्रिपुरामध्ये मशीद जाळल्याची अफवा पसरवण्यात आली होती. तेथील पोलिसांनी त्या मशिदीचा फोटोही जारी केला आहे. असे असतानाही महाराष्ट्रात मोर्चे काढले गेले, हिंसाचार झाला, हिंदू समाजातील लोकांची दुकाने जाळली गेली. आणि त्याचा आम्ही निषेध करतो. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नवाब मलिक (Nawab Malik) आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ‘त्रिपुरामध्ये जो हिंसाचार झाला, तो वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या विरोधात होता. वसीम रिझवीने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. वसीम रिझवीमुळे देशातील शांतता भंग पावली आहे. रिझवी यांच्यावर तातडीने कारवाई करावी. असे नवाब मलिक म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT