Supriya Sule Dainik Gomantak
महाराष्ट्र

धाडी पडणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? : सुप्रिया सुळेंचा केंद्राला सवाल

केंद्रीय तपास यंत्रणांवरुन सुप्रिया सुळे आक्रमक

दैनिक गोमन्तक

मुंबई : महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाल्याने ते सध्या तुरुंगात आहेत. तर मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची 6.45 कोटींच्या संपत्तीवर जप्त करत ईडीने त्यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. तर राज्यातील भाजपचे नेते या कारवाईचे उदाहरण देत, अशा अजून धाडी बाकी असल्याचे वारंवार सांगत आहेत. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सवाल केला आहे. त्यांनी ट्वीट करत, तर महाराष्ट्रातील कोणता नेता तुरुंगात जाणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? तर कोणावर धाडी पडणार हे त्यांना आधीच कसं समजतं? असे म्हटले आहे. तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईंवर सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक झाल्या आहेत. (Ncp supriya sule slams bjp government on ed cbi inquiries raid in maharashtra)

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केंद्र सरकार करत असल्याचे बोलले जात आहे. तर यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे. त्यातच आज मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नातेवाईंकाच्या पडलेल्या छाप्यावरुन भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधत, 'मला तुरुंगात टाकायचे असेल तर खुशाल टाका, परंतु कुटुंबीयांचा छळ करु नका. तुम्हाला सत्तेची हाव लागली आहे. सत्तेत यायचे असेल तर सत्तेत या, पण त्यासाठी खोटेपणा करु नका. माझ्या आणि इतर कोणाच्याही कुटुंबीयांना त्रास देऊ नका.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी लोकसभेत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावेळी खासदार सुळे म्हणाल्या की, 'ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) यांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभा आहे. या संस्था जर स्वतंत्र असतील तर भाजपचे काही नेते या संस्थांच्या धाडीच्या आधीच त्याची माहिती सोशल मीडियावरून कशी काय देतात? यासंबंधी माहिती लीक कशीकाय होते, त्याबद्दल केंद्र सरकारने खुलासा करावा.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT