NCP Convention/ Sharad Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

NCP Convention: शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल, म्हणाले- चीनच्या नावाने...

'माझ्या पक्षाला राष्ट्रीय स्वरुपात काम करायचे आहे, याचा मला अभिमान आहे', असे म्हणत पवार यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले आहे.

दैनिक गोमन्तक

NCP Convention: राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित करताना, माझ्या पक्षाला राष्ट्रीय स्वरुपात काम करायचे आहे, याचा मला अभिमान आहे, असे म्हणत पवार यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले आहे.

'शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर त्यांनी दिल्लीच्या सत्तेला आव्हान दिलं होतं, मराठा सरदारांनी दिल्लीच्या सत्तेला आव्हान दिलं होतं, आज त्याच दिल्लीत आमच्या पक्षाचं अधिवेशन होत आहे. पंतप्रधान म्हणाले होते की चिनी सैन्य घुसले नाही, पण आता त्यांनी चुकीचे वक्तव्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनच्या बाबतीत मोदी सरकारचे अपयश स्पष्ट झाले आहे,' असे म्हणत पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, "नितीश जी, ममता जी, केसीआर, स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव किंवा काँग्रेस, प्रत्येकजण पवार साहेबांकडे येतो आणि त्यांचे मार्गदर्शन घेतो, कारण सर्व पक्षांना पवार साहेबांनी हेच करावे असे वाटते. सर्वांना एकत्र ठेवणारा एकमेव नेता आहे.

विरोधकांच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या उमेदवारांमध्ये पवार!

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या उमेदवारांमध्ये शरद पवार यांचाही विचार केला जातो. यासाठी त्यांची तुलना अनेकदा नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्यासारख्या राजकीय नेत्यांशी केली जाते. शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे स्थान आहे. त्यांच्या कल्पनेतूनच महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना झाली, ज्यांचे सरकार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वी होते. पवार यांच्याच पुढाकाराने शिवसेना काँग्रेससोबत युतीत सामील झाली.

सध्या जवळपास सर्वच विरोधी पक्ष भाजपला टक्कर देण्यासाठी पुढाकार घेत आहेत, पण प्रत्येकाचे स्वतःचे हितसंबंध आहेत. अलीकडेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मिशन 2024 संदर्भात दिल्लीला भेट देऊन शरद पवारांसह सर्व विरोधी नेत्यांची भेट घेतली होती. शरद पवार यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. 2024 च्या महाभारतासाठी पवार हे देखील सत्तेच्या सर्वोच्च सिंहासनाच्या दावेदारांपैकी एक असल्याचे यावरून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT