Nawab Malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

'महात्मा गांधी गोर्‍यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू' : नवाब मलिक

महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणाला आर्यन खान प्रकरणामुळे वेगळेच वळण लागले. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणाला आर्यन खान प्रकरणामुळे वेगळेच वळण लागले. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले. याच पाश्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, मित्रांनो ऐकले आहे, आज काल माझ्या घरी सरकारी पाहुणे येतायेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. घाबरणे म्हणजे रोज मरणे, घाबरायचे नाही, लढायचे आहे. गांधी (Mahatama Gandhi) गोर्‍यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू. त्याचवेळी शुक्रवारी एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी बॉम्बे होई कोर्टात माफी मागितली आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही मुंबई उच्च न्यायालयासमोर यापुढे समीर वानखेडेविरोधात (Sameer Wankhede) प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वक्तव्य करणार नसल्याचे मान्य केले.

मुंबई उच्च न्यायालयाची माफी

नवाब मलिक यांनी जाणूनबुजून स्वतःच्या विधानाच्या विरोधात जाऊन एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध टिप्पणी केली, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी समीरचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या मानहानीच्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीरच्या कुटुंबाविरुद्ध वक्तव्ये करु नयेत, असे न्यायालयाला पटवून दिले होते. यानंतरही त्यांनी टिप्पणी केली. यासाठी त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

कोर्टाच्या या आदेशात मुलाखतीचाही समावेश असेल

नवाब मलिक म्हणाले की, स्वत:च्या विधानाच्या विरोधात जाऊन उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागतो. न्यायालयाच्या आदेशाचा अनादर करण्याचा किंवा त्याचे उल्लंघन करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. नवाब मलिक म्हणाले की, मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले. माझी मुलाखत न्यायालयात दिलेल्या विधानाच्या कक्षेबाहेरची आहे असे मला वाटते. त्यानंतर त्यांना सल्ला देण्यात आला की कोर्टाने दिलेल्या निवेदनात मुलाखतीत दिलेल्या उत्तरांचाही समावेश असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT