Navneet Rana  Dainik Gomantak
महाराष्ट्र

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच नवनीत राणा उद्धव ठाकरेंवर कडाडल्या

नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे.

दैनिक गोमन्तक

अपक्ष खासदार नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या, “मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर तुम्ही लोकांमधून निवडून येऊन दाखवा. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील तेथे मी उभी राहून जिंकून दाखवेन," असेही त्या म्हणाल्या. (Navneet Rana slams Uddhav Thackeray)

नवनीत राणा पुढे म्हणाल्या, “माझा ठाकरे सरकारला सवाल आहे की मी अशी काय चूक केली की त्याची मला शिक्षा देण्यात आली. जर हनुमान चालिसाचे पठण करणे आणि श्रीराम यांचे नाव घेणे गुन्हा असेल तर मी 14 दिवस नाही, तर 14 वर्षे तुरुंगात राहण्यास तयार आहे.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी 23 एप्रिल रोजी नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना अटक केली होती. दाम्पत्याची सुटका झाल्यानंतर नवनीत यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, वॉर्डच्या आतून एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये नवनीत रुग्णालयातील बेडवर झोपल्या होत्या आणि रवी राणा त्यांचे सांत्वन करत होते.

रवी राणा म्हणाले, "गेल्या सहा दिवसांपासून ती तुरुंग अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची विनंती करत होती, मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'व्याघ्र प्रकल्प नको' भूमिका चुकीची! खाणींसारखाच हाही गोव्याच्या हिताचा लढा - संपादकीय

Goa Politics: साडेतीन तास चर्चा,पण निर्णय नाहीच! काँग्रेसच्या युतीला 'आरजी'चा अडथळा; जागावाटप अधांतरी

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसला भीती उमेदवार चोरीची?

Goa Fraud Case: बनावट 'आयपीओ'चे आमिष; ज्येष्ठाची 4 कोटींची फसवणूक, कोल्हापूर येथून संशयिताला अटक

Goa Live News: 56th IFFI ईफ्फीत दिसलो सनी देवोलाचो हमशकल; Watch Video

SCROLL FOR NEXT