शिवसेनेकडून नारायण राणे यांच्याविराेधात मुंबईत बॅनर बाजी करण्यात आली आहे.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

नारायण राणे यांना अटक करण्यास नाशिक पोलीस कोकणाच्या दिशेने रवाना

मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे, केंद्रीय मंत्री Union Minister नारायण राणे Narayan Rane यांना चांगलेच भोवले आहे.

दैनिक गोमन्तक

नाशिक : मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे, केंद्रीय मंत्री Union Minister नारायण राणे Narayan Rane यांना चांगलेच भोवले आहे. नाशिकचे शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी राणें विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत राणेंविरोधात नाशिक महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणेंना आजच कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

या तक्रारीनंतर नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक Arrested करण्यात यावे, असे आदेश काढण्यात आले आहेत. समाजामध्ये तेढ, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकतो. यानुसार नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्यात येऊ शकतो. नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे. चिपळूनमध्ये आता मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नारायण राणेंवर नाशिक, महाड येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान आटक टाळण्यासाठी राणेंकडून कायदेशीर मार्गांची चाचपणी करण्यात येत आहे. राणेंवर कलम ५०० आणि ५०५ ही कलम लावण्यात आली आहे. ५०० म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आक्षेपार्ह विधान करणे, ५०५ म्हणजे चिथावणीखोर वक्तव्य तसेच १५३ दोन समाजात तेढ निर्माण करणे यासारखी कलम राणेंवर लावण्यात आली आहेत. भाजपने राणे यांना शिवसेने विरोधात उतरविले आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने राणेंचे कार्ड खेळले आहे.

नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रीया देण्यात आली आहे. ते म्हणाले, वाट पाहत आहोत, सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवण्याचे धाडस करु नका. या असे ते म्हणाले.

शिवसैनिकांच्या भावना तीव्र

चूकीच्या पध्दतीने वक्तव्य करतील तर त्यांना ते भोगावेच लागेल. ज्या पध्दतीने महाडच्या पत्रकार परिषदेत वक्तव्य करण्यात आले त्यावर सायबर क्राईमच्या द्वारे त्यावर करवाई करण्यात येईल. मंत्री पदाचा राजिनामा घ्यावा, मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. मोदींनी राणेंवर कारवाई करावी ही आमची पंतप्रधानांकडे मागणी आहे. मी पत्रकार परिषदेची क्लीप पाहिली. शिवसेनेकडून याबाबत कालपासून रणनिती आखण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडून नाशिक, महाड आणि पुण्यात देखील रोहीत कदम यांनी ही एफआयआर दाखल केली आहे. कलम १५३, १५३ बी, नाशिकच्या एफआयआरमध्ये जी कलमे आहेत त्यापेक्षा एक कलम जास्त लावण्यात आले आहे. मध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप विरुध्द शिवसेना यांच्यातील वाद पेटणार हे निश्चित आहे. याचे पडसाद आता मुंबईत उमटू लागले आहेत. शिवसेनेकडून राणेंवर शेलक्या शब्दात टिका करण्यात आळी आहे. त्याचे बॅनर देखील दादरमध्ये लावण्यात आले आहेत. नारायण राणे यांना शिवसेनेने संपूर्ण ताकदीने घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT