Narendra Chapalgaonkar Dainik Gomantak
महाराष्ट्र

Marathi Sahitya Sammelan: 'नरेंद्र चपळगावकर' 96 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची आज मंगळवारी वर्धा येथे बैठक पार पाडली.

गोमन्तक डिजिटल टीम

वर्धा येथे होणाऱ्या 96 व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यीक नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonkar) यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची आज मंगळवारी वर्धा येथे बैठक पार पाडली. या बैठकीत नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

नरेंद्र चपळगावकर मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. चपळगावकर वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. नरेंद्र चपळगावकर यांनी संघर्ष आणि शहाणपण, दीपमाळ, आठवणीतले दिवस आणि कायदा आणि माणूस यांसारख्या पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले असून, त्यांनी अनेक संस्थांवर काम केले आहे.

'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा मराठी भाषा आणि मराठी साहित्याबद्दल मत मांडण्याची मोठी संधी आहे, असं मी मानतो. ही संधी मला दिल्याबद्दल मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आभार मानतो.' अशी प्रतिक्रिया नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांची निवड झाल्यानंतर दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT