आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज Dainik Gomantak
महाराष्ट्र

Narayan Rane Statement Effect: आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील नाशिक येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात दगडफेक करण्यात आली आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) नेते नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर या घटनेला वेगळच वळण लागले आहे. केवळ नाशिकातच नाही तर आता मुंबई, अमरावती, रत्नागिरीसह अनेक शहरांमध्ये नारायण राणेंच्या विरोधात निदर्शने होत आहेत. दरम्यान राणेंच्या डेक्कन येथील आर डेक्कन मॉलवर देखील शिवसैनिकांनी दगडफेक केली.

आर डेक्कन मॉलवर शिवसैनिकांनी दगडफेक केली

दुसरीकडे, नाशिक पोलिस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी बाहेर रवाना झाले आहेत. मुंबईतही शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून राणेंच्या अटकेची मागणी करत आहेत. दरम्यान मुंबईतील शिवसेना कार्यकर्ते, भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली कारण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानाकडे कूच केलेा होती.

त्याचबरोबर जुहूतील राणेंच्या बगंल्यामोर शिवसेना -भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. युवासेनेचे कार्यकर्ते वरुण सरदेसाई यांनी भाजपा कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप केला आहे, तर भाजपाने शिवसेनेने दगडफेक केल्याचे म्हटले आहे.

एकीकडे नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेवकांचा रोष दिसून येत आहे, तर त्यांचा मुलगा आणि आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र पोलिसांवर आरोप केले आहेत. त्यांना रत्नागिरीजवळ थांबवण्यात आले, पोलिसांनी त्यांना मारहाण करण्याची धमकी देण्यात आली, असे नितेश राणे यांनी सांगितले.

हिंदुत्वाशी गद्दारी करुन ह्यांनी सत्ता मिळवीली : राणे

राज्यात सत्ता त्यांची आहे, हिंदुत्वाशी गद्दारी करुन सत्ता मिळवीली आहे. काही दिवसांनी ते सत्तेवर नसतील. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आवरले नाही आणि मी जर माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले तर यांची पळता भूई थोडी होती. कोकणात मी नवे उद्योग सुरु करणार आहे. असे वक्तव्य नारायण राणे यांनी संगमेश्वरमध्ये जनआशिर्वाद यात्रेवेळी केले आहे. ते संगमेश्वरमध्ये आल्यावर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण होते.

मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर गदारोळ

वास्तविक, नारायण राणे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात विधान केले. या वक्तव्यात ठाकरे यांच्यावर टीका करण्याबरोबरच त्यांना 'कानशिलात' मारण्यापर्यंत बोलले होते. राणे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

त्यानंतर आज राणेच्या अटकेसाठी नाशिक पोलीस रत्नागिरीला रवाना झाले आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे शिवसेना कार्यकर्त्यांचा राग नारायण राणे यांच्यावरही दिसून आला आहे. नाशिकमधील भाजप कार्यालयावर दगडफेक करण्यात येत आहे. दगडफेकीची काही चित्रेही समोर आली आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून आपला राग व्यक्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राणेंनी रायगडमध्ये हे विधान केले

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रायगडमध्ये भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले आहे. "स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे मुख्यमंत्र्यांना माहीत नाही हे लज्जास्पद आहे. त्याच्या भाषणादरम्यान त्याने मागे वळून आपल्या सहकाऱ्याला विचारले. जर मी तिथे असतो तर मी त्याला कानशिलात मारली असती."

याच विधानावरून राणे यांच्याविरोधात चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आज नाशिक पोलीस त्याला अटक करण्याची तयारी करत आहेत. तर राज्यभर शिवसैनिक त्यांच्या विरोधात निदर्शने आणि आंदोलन करत आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT