Narayan Rane  
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी गृहमंत्र्यांना पत्र : नारायण राणे 

दैनिक गोमन्तक

मनसुख हिरेन प्रकरणात अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारवर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आता जोरदार आरोप केले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार अयशस्वी ठरत असल्याचे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे. राज्यात सूरु असलेल्या मनसुख हिरेन प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा घेऊन, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आपण गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. (Narayan Rane has demanded the imposition of presidential rule in Maharashtra)

मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्यावर झालेले आरोप आणि त्यानंतर निर्माण झालेली एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकार अडचणीत सापडले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच आता शिवसेनेनवर नेहमीच टीकास्त्र सोडणारे नारायण राणे (Narayan Rane) यांनीही या प्रकरणी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. "महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार राज्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यास असमर्थ आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या सारखी व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहे. व राज्यातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु आहे," असा आरोप त्यांनी केला. तसेच  यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आपण अमित शाहांना पत्र लिहिल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Narayan Rane has demanded the imposition of presidential rule in Maharashtra)

दरम्यान, (Narayan Rane has demanded the imposition of presidential rule in Maharashtra) या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारने याअगोदर मोठा निर्णय घेत मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची बदली केली होती. व त्यानंतर हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी राज्यसरकारने आपली नियुक्ती केल्याची माहिती यानंतर पत्रकार परिषदेत दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT