दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा पंढरीच्या वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. या मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फलक लावला आहे. या फलकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकरी संप्रदायाचा पेहराव केल्याचे दिसत आहेत. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांना सांकेतिक भाषेत टोला लगावला आहे. (Nana Patole criticized Prime Minister Modi )
भाजप पक्षाने पुण्यात पालखी मार्गावर नरेंद्र मोदी यांचा भव्य फलक लावला आहे. यामध्ये विठू माऊली, संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम महाराज असं कुणीही दिसत नाहीये. याच मुद्द्यावरून नाना पटोले यांनी ‘कभी कभी लगता है, अपुन ही भगवान है’ म्हणत मोंदीवर निशाना साधला आहे. यावरुन त्यांनी एक ट्वीट करत म्हटलं की, “भाजपाने पुण्यात पालखी मार्गावर नरेंद्र मोदी यांचा भव्य बॅनर लावला आहे. त्यामध्ये विठू माऊली, संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकोबा हे मात्र दिसत नाहीत. म्हणूनच पटोले यांनी हा टोला लगावला आहे.
ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांच्या संगतीने पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदी आणि देहूमध्ये दाखल झाल्या आहेत. ही परंपरा सुमारे 300 हून अधिक वर्षाची आहे. आणि या पालखी सोहळ्यासह वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी जमा होतात. सर्व दिंड्या मजल - दरमजल करत पंढरपुरकडे सरकत असतात. तसेच महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यातून वारकरी या वारीत सामिल होत असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.