Crime

 

Dainik Gomantak

महाराष्ट्र

...यामुळे सासऱ्यानेच केला जावयाचा खून; मग स्वत: केली आत्महत्या!

पुतणीला त्रास दिल्याच्या रागावरून चुलत सासऱ्यानेच जावयाचा खून केला आणि मग स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दैनिक गोमन्तक

Crime: लातूर शहराजवळील कातपूर या ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पुतणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून चुलत सासऱ्याने आपल्या जावयाची हत्या (Murder) केली आणि पोलिसांच्या भीतीपोटी स्वत: गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेश देशमुख यांनी सोयाबीन विक्रीचे पैसे आल्यावर आपल्या मित्रांना आणि चुलत सासरे शिवाजी शिंदे यांना मद्य सेवनासाठी हॉटेलमध्ये बोलावले होते. आनंदाच्या भरात अति मद्य (Alcohol) प्राशन केल्यामुळे उमेश हा सासऱ्याने चालवायला घेतलेल्या साईधन लॉज येथे गेला. त्यावेळी उमेशची बायको आणि शिवाजी शिंदे यांची पुतणी देखील तिथे होती. त्यावेळी उमेश आपल्या पत्नीला त्रास देऊ लागला. याबाबत सासऱ्याने विचारणा केली असता, उमेश आणि शिंदे यांच्यामध्ये वाद सुरू झाला.

हा वाद एवढा विकोपाला गेला की जावई आणि सासऱ्यामध्ये हाणामारी सुरू झाली. आपल्या पुतणीला त्रास देतो म्हणून रागाच्या भरात शिंदे यांनी पडद्याच्या रॉडने (Rod) जावयाच्या डोक्यात जोरदार वार केला. यातच उमेश गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. एकंदरीत चाललेल्या गोंधळाने आजूबाजूची लोक आली आणि त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला.

यावर शिंदे यांनी आपली बाजू सावरत जावयाची चूक असल्याचे ते लोकाना सांगत होते. पण लोकानी लगेचच पोलिसांना बोलावले. याचवेळी पोलिसांच्या भीतीमुळे शिंदे यांनी लॉजमधीलच एका खोलीत स्वत:ला गळफास लाऊन घेत आत्महत्या (Suicide) केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

Angaraki Sankashti Chaturthi: कर्ज आणि रोगांपासून मुक्ती हवी? जाणून घ्या अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Angarki Chaturthi 2025 Wishes In Marathi: बाप्पाला वंदन करा... अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा या शुभेच्छा

Weekly Health Horoscope: 'या' आठवड्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता! 'या' राशींनी टाळावा ताण आणि चुकीचा आहार

British Fighter Jet: ब्रिटनच्या फायटर जेटचे जपानमध्ये इमर्जन्सी लँडिंग, दीड महिन्यातील दुसरी घटना; चीन-रशियाने उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT