Relationship Dispute Violence Mumbai Dainik Gomantak
महाराष्ट्र

Crime News: तिचे केस तुला आवडतात ना? मग घे! प्रियकराच्या 'त्या' एका वाक्यानं प्रेयसीचं डोकं सरकलं अन् रागात तिनं...

Relationship Dispute Violence Mumbai: मुंबईच्या ग्लॅमरस समजल्या जाणाऱ्या वर्सोवा परिसरातून एक काळजाचा थरकाप उडवणारी आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली.

Manish Jadhav

Relationship Dispute Violence Mumbai: मुंबईच्या ग्लॅमरस समजल्या जाणाऱ्या वर्सोवा परिसरातून एक काळजाचा थरकाप उडवणारी आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली. आपल्या प्रियकराचे दुसऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या निव्वळ संशयावरुन संतापलेल्या प्रेयसीने आपल्या साथीदारांसह त्या संबंधित तरुणीच्या घरात घुसून तिला केवळ बेदम मारहाणच केली नाही, तर तिचे केसही कापून टाकले. इतकेच करुन ही आरोपी तरुणी थांबली नाही, तर कापलेले केस ती सोबत घेऊन गेली. या विचित्र आणि हिंसक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पीडितेच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थिनी असून तिची ओळख हर्षद नावाच्या एका तरुणासोबत एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून त्यांच्यात संवाद होत असे. मात्र, हर्षदचे मुख्य आरोपी असलेल्या लायबा नावाच्या तरुणीसोबत आधीच प्रेमसंबंध होते. या वादाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा हर्षदने लायबासमोर पीडित तरुणीच्या लांबसडक केसांचे कौतुक केले. आपल्या प्रियकराने दुसऱ्या मुलीच्या सौंदर्याची स्तुती केल्याने लायबाच्या मनात संशयाचे भूत शिरले आणि त्यातूनच तिने या क्रूर कृत्याचा कट रचला.

ही घटना घडली तेव्हा पीडित तरुणी घरात एकटीच होती. याच संधीचा फायदा घेऊन मुख्य आरोपी लायबा आपल्या दोन साथीदारांसह पीडितेच्या घरात घुसली. या तिघांनी मिळून पीडितेवर हल्ला केला, तिला जबरदस्तीने घराबाहेर खेचले आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरु असतानाच लायबाने पीडितेचे केस कापले. विशेष म्हणजे, या संपूर्ण कृत्याचा आरोपींनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ देखील बनवला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. याआधीही या संशयावरुन त्यांच्यात वाद झाले होते, पण यावेळी लायबाने हिंसेचा मार्ग स्वीकारला.

घटनेनंतर प्रचंड दहशतीखाली असलेल्या पीडितेने हिंमत एकवटून पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. पोलिसांनी (Police) या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या टोकाच्या मत्सर आणि संशयामुळे एका तरुण विद्यार्थिनीला अशाप्रकारे अपमानित व्हावे लागल्याने वर्सोवा परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून या कृत्यात सहभागी असलेल्या इतर साथीदारांचीही चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Garden: काँक्रिटच्या विळख्यात पणजीची हिरवाई जपणारं एक अद्भूत स्थान; 'जार्दिम गार्सिया द ओर्ता'

Pakistan ODI Cricket Record: वनडे क्रिकेटमधील लाजिरवाणा रेकॉर्ड; एकाच डावात 6 फलंदाज 'डक'वर आऊट, क्रिकेट विश्वात पाकड्यांची पुन्हा नाचक्की

Crime News: 15 व्या वर्षी लग्न, दोनदा तीन तलाक अन् हलालाचा 'नरक'! लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हाय कोर्टाने ओढले ताशेरे; म्हणाले, 'अशा प्रथा...'

Shukra Chandra Yuti 2026: 16 जुलैला आकाशात महासंयोग! शुक्र-चंद्राची युती 'या' 5 राशींना बनवणार करोडपती; लव्ह लाईफमध्येही मिळणार गूड न्यूज

PF New Rules Update: एक चुकीचा निर्णय अन् निवृत्तीचा फंड धोक्यात! इपीएफओचा नवा 1800 रुपयांचा नियम; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT