Mumbai Online Crime Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Railway Police Twitter Account Hack: मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक, नव्या ट्विटवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Mumbai Railway Police: जोपर्यंत ट्विटर अकाऊंट रिस्टोअर होत नाही तोपर्यंत नवीन ट्विटवर विश्वास ठेवू नका, असे मुंबई पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Mumbai Railway Police Twitter Account Hacked: मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट अचानक कोणीतरी हॅक केले. अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. या ट्विटर हँडलवरून जे काही नवीन ट्विट केले जातील त्यावर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी मुंबईत राहणाऱ्या लोकांना सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती दिली जाईल, त्यानंतरच रेल्वे पोलिसांच्या ट्विटकडे (Twitter) लक्ष द्या. या प्रकरणी एजन्सी तपासात गुंतल्या असून, खाते लवकरात लवकर पूर्ववत केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. 

काही काळापासून सायबर क्राईमच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हॅकर्स ट्विटर (Twitter) आणि फेसबुक (Facebook) अकाउंटला टार्गेट करत आहेत. हे थांबवण्यासाठी भारतात (India) सर्व एजन्सी कार्यरत असून कडक यंत्रणा तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

  • हरियाणातील सायबर क्राईमवर मंथन
    हरियाणामध्ये गृह मंत्रालयातर्फे एक चिंतन शिविर आयोजित केले जात आहे, ज्यामध्ये सायबर क्राईमवर (Cyber Crime) विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. या शिबिरात अनेक राज्यांतील उच्च पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. गुरुवारी 27 ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी या चिंतन शिबिराला संबोधित केले. सायबर गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी, सीमा व्यवस्थापन, कट्टरतावाद यांसह अनेक आव्हानांवर चिंतन शिबिरात विचारमंथन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  या शिबिराला संबोधित करणार आहेत.

  • व्हॉट्सअॅपबाबत ही सायबर हल्ला

काही दिवसांपूर्वी लोकप्रिय व्हॉट्सअॅप (Whats App) सुमारे दीड तास बंद असताना सायबर हल्ला झाल्याचीही शक्याता दर्शवली जात होती. सायबर तज्ज्ञांचा असा विश्वास होता की हे सायबर सुरक्षा भंगाचे प्रकरण आहे. इतके दिवस व्हॉट्सअॅप बंद राहिल्याने आश्चर्य वाटले. पण, व्हॉट्सअॅपने जारी केलेल्या निवेदनात ही तांत्रिक चूक असल्याचे म्हटले आहे. ही त्रुटी का आणि कशी झाली याची माहिती कंपनीने दिलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT