Accident News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन ट्रकचा भीषण अपघात

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांचा अपघातात तीन ट्रकची एकमेकांना धडक.

दैनिक गोमन्तक

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. तीन ट्रकनी एकमेकांना धडक दिली असून धडकेत एक ट्रक दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. दरीत कोसळलेल्या ट्रकच्या कॅबिनमधून अडकलेल्या चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या भीषण अपघातात अद्याप कोणतीही जीवीतहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

आज सकाळी ४ च्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस (Mumbai-Pune) मार्गावरील बोरघाटात भीषण अपघात झाला. तीन वाहनांती एकमेंकांना धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात मुंबईकडे (Mumbai) येणाऱ्या मार्गावर तीन वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने कंटेनर ट्रक सुमारे शंभर फूट खोल दरीत कोसळला. तसेच, आणखी एका ट्रकची कॅबिनही दरीत कोसळली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पहाटेच्या सुमारास मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावरील ढेकू गावाजवळ तीन वाहनांनी एकमेकांना जोरदार धडक दिली. एक्सप्रेसवेवरील बोरघाटात तीन ट्रकनी एकमेंकांना धडक दिली. यानंतर त्यापैकी एक ट्रेलर 100 फूट खोल दरीत कोसळला. तर दुसऱ्या ट्रकची केबिन या ट्रेलर पाठोपाठ दरीत कोसळली. तर तिसरा ट्रक रस्त्यात पलटी झाला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT