Jitendra Awhad
Jitendra AwhadDainik Gomantak

Jitendra Awhad On MNS: माझ्यावरील विनयभंगाचा गुन्हा एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Published on

Jitendra Awhad On MNS: एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून माझ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या वरिष्ठ नेत्याने संबंधितांना बोलून माझ्यावर असा खोटा गुन्हा दाख करण्यास सांगितले होते, असेही आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad
Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार थांबला; 89 जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान

आमदार आव्हाड यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, "ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाच्या खेळादरम्यान झालेल्या गदारोळ प्रकरणातील तक्रारदार परिक्षित धुर्वे ह्याला मनसेच्या ठाण्यातील एका वरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याशी बोलणे करून दिले होते. आणि त्या दोघांनी मिळून तक्रारदाच्या पत्नीला माझ्यावर कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास सांगितले."

जितेंद्र आव्हाडांनी पुढील ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मी त्या ताईचा आभारी आहे, की त्या ताईने स्वत:हून सांगितले, की मी असला घाणेरडा गुन्हा दाखल करु शकत नाही. आणि आपल्या मतावर ती ठाम राहिली. घोडबंदरचा एक नगरसेवक ह्या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी होता. म्हणजे माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करायचा हे कधीपासून ठरले होते, असेही आव्हाडांनी म्हटले आहे.

Jitendra Awhad
Mallikarjun Kharge On PM Modi: 'तुम्हाला रावणासारखी 100 डोकी....,' PM मोदींवर खर्गेंनी साधला निशाणा

जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव या चित्रपटाचा खेळ बंद पाडला होता. त्यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आव्हाडांसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या वेळी परिक्षित धुर्वे यांनी आणि त्यांच्या पत्नीने धक्काबुक्की झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणात आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाडांनी, सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचे सांगत थेट राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com