Mumbai Police seized heroin not heroine says Uddhav Thackeray  Dainik Gomantak
महाराष्ट्र

'आमच्या पोलिसांनी 'हिरॉईन' नाही 'हेरॉईन' पकडली' उद्धव ठाकरेंचा NCB ला सणसणीत टोला

त्यांनी 'आमच्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी चार दिवसांपूर्वी 25 कोटींचे ड्रग्ज पकडले. त्यांनी 'हिरॉईन' नव्हे तर 'हेरॉइन' पकडली. म्हणूनच त्यांना प्रसिद्धी मिळाली नाहीअसे सांगत त्यांनी पोलिसांची पाठ थोपटली आहे

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा NCBला लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी एनसीबीचा खरपूस समाचार घेत महाराष्ट्र पोलिसांनी हिरॉईन (अभिनेत्री) नव्हे तर हेरॉईन (ड्रग्ज) पकडले त्यामुळे मुंबई पोलिसांना (Mumbai Police)प्रसिद्धी मिळाली नाही. असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच मोठी कारवाई करत 25 कोटी रुपयांची आम्ली पदार्थ पकडले आहेत.(Mumbai Police seized heroin not heroine says Uddhav Thackeray)

काल आर्यन खान प्रकरणात NCB ने अभिनेत्री अनन्या पांडे हिची देखील चोकशी केली आहे. त्याच पार्शवभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे विधान आले आहे. तसेच 'आजकाल एकच गोष्ट घडत आहे ड्रग्स, ड्रग्स आणि ड्रग्स. दसरा मेळाव्यातही मी म्हणालो होतो की एकट्या महाराष्ट्रात संपूर्ण जगात पेक्षाजास्त ड्रग्जचे सेवन होत , असे चित्र उभं केलं जात आहे पण असं नाही' असे सांगत मुख्यमंत्रांनी NCB ला खडेबोल सुनावले आहेत.

त्याचबरोबर त्यांनी 'आमच्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी चार दिवसांपूर्वी २५ कोटींचे ड्रग्ज पकडले. त्यांनी 'हिरॉईन' नव्हे तर 'हेरॉइन' पकडली. म्हणूनच त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही. पण त्यांचा आम्हाला अभिमान वाटला.' असे सांगत त्यांनी पोलिसांची पाठ थोपटली आहे. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे असे सांगत महाराष्ट्र पोलीस दल सशक्त, कार्यक्षम आहे आणि आम्ही गुन्हेगारांबाबत कोणताही उदारपणा दाखवत नाही आणि आम्ही त्यांच्याशी कडकपणे वागतो आणि आमची ही प्रतिष्ठाच काही लोकांकडून जाणीवपूर्वक बदनाम केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान मुंबई क्रूज प्रकरणात एनसीबीच्या तपासाची व्याप्ती वाढत आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात तुरुंगात आहे आणि आता अभिनेत्री अनन्या पांडेही ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आली आहे. शुक्रवारी याप्रकरणी अनन्या पांडेची दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT