Drugs Case Dainik Gomantak
महाराष्ट्र

Drugs Case: मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये 513 किलो अमली पदार्थ केले जप्त

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने गुजरातच्या भरूच जिल्ह्यात अमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने गुजरातच्या भरूच जिल्ह्यात अमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी भरूचमधील अंकलेश्वर परिसरातून सुमारे 513 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले तसेच जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1,026 कोटी रुपये एवढी आहे. (Mumbai Police seized 513 kg of drugs in Gujarat)

या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह सात आरोपींना अटकेत घेतले आहे. यापैकी 5 जणांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली असून दोन आरोपी अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कोठडीमध्ये आहेत.

यापूर्वी मुंबई पोलिसांनी शिवाजी नगर येथून अमली पदार्थांची खेप पकडल्यानंतर त्याचा स्रोत शोधण्यामध्ये पोलिस गुंतले होते. ही खेप पकडण्यासाठी मुंबई पोलिसांना पाच महिने संघर्ष करावा लागला आहे आणि यासाठी मुंबई पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधी कक्ष सातत्याने कार्यरत होता.

गेल्या 13 तारखेला गुजरातमधील अंकलेश्वर येथूनही एक खेप पकडण्यात आल्याने संघाला मोठे यश मिळाले आहे. अनेक राज्यात पसरलेली ही आंतरराज्यीय अमली पदार्थ टोळी असल्याचे पोलिसांना वाटते आहे. ही टोळी विशेषतः तरुणांना टार्गेट करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

Goa News Live: Formula – 4 मुरगावमध्ये होणार; मंत्री दिगंबर कामत यांच्याकडून शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT