Mumbai Police crime branch sent notice to Parambir Singh Dainik Gomantak
महाराष्ट्र

परमबीर सिंग हाजीर हो! मुंबई पोलसांची नोटीस

मुंबई पोलिसांनीशनिवारी IPS अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या निवासस्थानाबाहेर एक नोटीस पेस्ट केली आहे

दैनिक गोमन्तक

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शनिवारी IPS अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या निवासस्थानाबाहेर एक नोटीस पेस्ट केली आणि त्यांना खंडणी प्रकरणात 12 ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे . अलीकडेच, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) देश सोडून गेल्याच्या बातम्या आहेत पण कोणतीही पुष्टी नाही. सिंग यांच्यावर राज्यात किमान पाच गुन्हे दाखल आहेत.(Mumbai Police crime branch sent notice to Parambir Singh)

अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा गोरेगाव येथील उपनगरामध्ये सिंह यांच्याविरोधात खंडणीच्या गुन्ह्याचा तपस करत आहे आणि याच प्रकरणात त्यांची चौकशी देखील करायची आहे. एका पोलीस पथकाने सिंह यांच्या मलबार हिल परिसरातील नीलिमा भवन येथील फ्लॅटवर जाऊन नोटीस चिकटवली आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

बिल्डर कम हॉटेल व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्यावर गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंह व्यतिरिक्त, बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाजे, सुमित सिंग उर्फ ​​चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंग उर्फ ​​बबलू आणि रियाज भाटी यांना देखील या एफआयआरमध्ये आरोपी बनवण्यात आले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबई निवासस्थानाजवळ सापडलेल्या एसयूव्हीच्या संदर्भात सचिन वाजे यांना अटक केल्यानंतर परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस प्रमुख पदावरून काढून टाकण्यात आले होते. सिंग यांनी नंतर आरोप केला की तत्कालीन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाजे यांना मुंबईतील हॉटेल्स आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. देशमुख यांनी हा आरोप फेटाळला होता.आणि याचभोवती राज्याचं राजकारण चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: बेकायदा नाईटक्लबवर कारवाई न करणं पडलं महागात, हडफडे पंचायतीच्या सचिवाची सेवेतून केली हकालपट्टी; गोवा सरकारचा मोठा दणका

सारा तेंडुलकरच्या हातातील 'त्या' बाटलीवरुन सोशल मीडियावर गदारोळ! गोव्यातील व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी सचिनच्या लेकीला केलं ट्रोल VIDEO

Bollywood: 2025 गाजवले छावा, धुरंधरने! सलमानसह अनेक स्टार्सचे सिनेमे फ्लॉप; वाचा 'या' वर्षाचा बॉलिवूडचा आलेख

परंपरेच्या नावाखाली निष्पापांचा बळी! खतना विधीदरम्यान 41 तरुणांचा मृत्यू, पालकांच्या हलगर्जीपणावर संतापले मंत्री; 41 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जर्मनीत बँकेची भिंत फोडून चोरी केले 290 कोटी रुपये; ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये केला होता मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT