भाजपच्या जनअर्शिवाद यात्रेला मोठी गर्दी झाली, त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी यावर विविध ठिकाणी 19 गुन्ह्यांची नोंद (Mumbai Police has registered 19 cases in various places) केली आहे.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

राणेंनी काढलेल्या जनअर्शिवाद यात्रेवर मुंबई पोलिसांची कारवाई, 19 गुन्ह्यांची नोंद

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात जनआर्शिवाद यात्रा काढली. त्यावर हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Union Minister Narayan Rane) यांनी काढलेल्या जनअर्शिवाद यात्रेला (Jana Arshivad Yatra) कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या गर्दीवर आता पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्यास मनाई असताना देखील भाजपच्या जनअर्शिवाद यात्रेला मोठी गर्दी झाली, त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी यावर विविध ठिकाणी 19 गुन्ह्यांची नोंद (Mumbai Police has registered 19 cases in various places) केली आहे. यामध्ये माहिम आणि आग्रीपाडा पोलीस स्थानकात तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

या शिवाय शिवाजी पार्क, दादर, आझाद मैदान, खैरवाडी, चेंबूर, विले पार्ले, सायन, गोवंडी आणि विमानतळ भाग येथील पोलीस ठाण्यात कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 आणि मुंबई पोलीस कायदा कलम 135 नुसार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यात सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करणे व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात जनआर्शिवाद यात्रा काढली. त्यावर हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

या यात्रेची सुरुवात राणेंनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करुन केली. पण राणेंनी शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुखांच्या स्मृती स्थळाला अभिवादन केल्यानंतर शिवसैनिक आप्पा पाटील यांनी ही जागा गोमुत्र आणि दुधाचा अभिषेक करुन शुद्ध करण्यासाठी केली. त्यावर राणे आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर तीव्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्यात आता गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान, काढण्यात आलेल्या जनआर्शिवाद यात्रेवर मुंबई पोलिसांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल राणेंसह आयोजकांवर आणि भाजप 19 एफआयआर नोंदविल्याने आता राणे विरुध्द शिवसेना वाद आणखीनच पेटण्याची चिन्हे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT