Adar Poonawalla 
महाराष्ट्र

आदर पुनावालांना 'झेड प्लस' सुरक्षेची मुंबईच्या वकिलाने केली मागणी

दैनिक गोमंतक

मुंबईच्या एका वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली असून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute) सीईओ आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांना झेड-प्लस (Z+) सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. सीरम संस्था कोविडशील्ड लसीचे (Covishield) उत्पादन करते. अधिवक्ता दत्ता माने यांनी ही याचिका दाखल केली आहे. पूनावाला यांना लस पुरवठ्याबाबत धमकावणाऱ्यांवर एफआयआर (FIR) नोंदविण्याची मागणी याचिकेत केली आहे. माने यांनी याचिकेत म्हटले आहे की जर लस उत्पादकांना देशात सुरक्षित वाटत नसेल तर त्याचा परिणाम लसीच्या उत्पादनावरही होऊ शकतो. ते म्हणाले की, जर भीतीमुळे पूनावाला भारताबाहेर राहिले तर ते कप्तान विना जहाज चालवल्या सारखं आहे. (Mumbai lawyer demands 'Z-plus' security for Adar Poonawalla)

अलीकडेच केंद्र सरकारने अदार पूनावाला यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. गृह मंत्रालयाने यासंदर्भात पूनावालांना प्राप्त होणार्‍या धमक्या लक्षात घेता संभाव्य धोक्याचा आढावा घेऊन हा आदेश जारी केला होता.माने यांनी माध्यमांच्या वृत्तांचा उल्लेख केला आहे ज्यात असे म्हटले होते की सतत दबाव व धमक्यामुळे पूनावाला भारत सोडून ब्रिटनला गेले. वास्तविक, लस पुरवण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि अनेक राज्यांतील बड्या उद्योजकांकडून आपल्याला धमक्या मिळत असल्याचे पूनावाला म्हणाले होते.

केंद्रीय गृह मंत्रालयाने पूनावाला यांना जी वाय वर्गाची सुरक्षा दिली होती, ती त्यांच्यासाठी पुरेशी नाही, केंद्राकडून संरक्षण दिल्यानंतरही ते युकेला गेले होते, असे याचिकेत नमूद केले आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात एफआयआर नोंदवावी अशी मागणी माने यांनी केली आहे जेणेकरून दबाव आणणाऱ्या  लोकांवर कारवाई होऊ शकेल. विशेष म्हणजे कोविशील्ड लस तयार करणारे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे सीईओ आदर पूनावाला यांनी लंडनमध्ये आल्यानंतर एका मुलाखतीत सांगितले की, भारतात कोरोना लसीसाठी त्याला अनेक कॉल येत आहेत, ज्यात त्यांना प्रभावी लोकाकांकडून धमक्या मिळत आहेत ते म्हणाले की फोन कॉल सर्वात वाईट गोष्ट आहे. मला सतत धमकीचे कॉल येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CENA IS BACK.... WWE चाहत्यांसाठी मोठी बातमी! जॉन सीनाच्या कमबॅकची घोषणा; RAW मध्ये दिसणार 16 वेळचा 'वर्ल्ड चॅम्पियन'

Prepaid Smart Meters: प्रीपेड स्मार्ट मीटर जोडणी कायमस्वरुपी बंद करा! अमित पाटकरांचा वीज खात्याला 15 दिवसांचा अल्टीमेटम

Margao October Heatwave: मडगावकरांचा ऑक्टोबर हिटने काढला घाम! पारा 37.7 अंशांवर, अवघ्या दोन तास चाळीस मिनिटांत तापमानात तीन अंशांची वाढ

8th Pay Commission: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ८व्या वेतन आयोगाचे 5 महत्त्वाचे अपडेट्स; पगारवाढीचा अंतिम निर्णय कधी होणार?

Goa Politics: 'वीरेश बोरकरांनी चोडणकरांकडून तीन कोटी घेतले', अजय खोलकरांच्या आरोपाने गोव्यात खळबळ; 'आरजी'तील अंतर्गत कलह विकोपाला

SCROLL FOR NEXT