Mumbai International airport
Mumbai International airport Twitter/ @PrakarshGagdani
महाराष्ट्र

मुंबई विमानतळावर व्यवस्थपानाचा उडाला फज्जा; गोंधळामुळे प्रवाशांची झाली प्लाईट मिस

दैनिक गोमन्तक

देशातील व्यस्त विमानतळापैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर (Mumbai International airport) तुफान गर्दी पाहायला मिळाली. सगळीकडे गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रवाशांनी आपली प्लाईट्स मिस होण्याला गर्दी हाताळता न आलेल्या एअरपोर्ट यंत्रणेला जबाबदार ठरवलं आहे. बऱ्याच वेळापासून प्रवासी लांबच लांब रांगामध्ये अडकून राहिल्याचं चित्र होतं. मात्र दुसरीकडे डोमेस्टीक एअरलाईन्स असलेल्या इंडिगो कंपनीने (Indigo Company) प्रवाशांना सुरक्षेच्या तपासासाठी आवश्यक वेळ मिळण्यासाठी तात्काळ रिपोर्ट करण्याचा सल्ला दिला होता. तर काही प्लाईट्संना उशीरा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, विमानतळावरील एक अधिकाऱ्याने सांगितले की, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या संख्येमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. विमानतळावर अतिरिक्त सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आले आहे. आम्ही आमच्या सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची कसर सोडलेली नाही. मात्र सुरक्षा तपासणीमुळे ही तोबा गर्दी वाझली आहे. आम्ही तात्काळ एक प्रसिध्द वक्तव्य प्रसिध्द करु.

तसेच, निराश झालेल्या प्रवाशांनी सोशल मिडियावर आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. यातच प्रसिध्द गायक विशाल दादलानी (Vishal Dadlani) यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मुंबई विमानतळावर सध्या गोंधळाचे वातावरण आहे. असं वाटतयं की आम्ही आधीच्या कोणत्यातरी काळात आहोत. लोकांची तुफान गर्दी आहे. विमानताळावरील मशीन्स काम करु शकत नाहीत. सगळीकडे अराजकतेचे वातावरण पसरलेले आहे. एअरपोर्ट कर्मचारी आपल्या परीने शक्य तेवढी प्रवाशांना मदत करत आहेत. हे अराजकतेचे वातावरण कशामुळे पसरले आहे, कृपया त्यांना टॅक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर; युरी आलेमाव यांचा आरोप

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT