Mumbai Goa Highway: Dainik Gomantak
महाराष्ट्र

Parashuram Ghat: मुंबई-गोवा मार्गावरील परशुराम घाट 25 मे पर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतूकीसाठी आज पासून बंद असणार आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतूकीसाठी आज पासून बंद असणार आहे. 25 एप्रिलपासूनते 25 मे पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजेच सहा तास घाट बंद असणार आहे. येथे सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये आणि कामाला गती मिळावी म्हणून हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी धोकादायक भागातील काम पूर्ण व्हावे यासाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. (Mumbai Goa Highway Latest News)

हा मार्ग बंद केल्यामुळे पर्यायी वाहतूक लाईट वेट चिरणी - आंबडस ते कळबस्ते - चिपळूण मार्गे वळवण्यात आली आहे. पर्यायी मार्गावरून वाह तूकीसाठी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Parashuram Ghat Latest News)

परशुराम घाट चौपदरीकरणाच्या कामावेळी घाटाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या दुर्गवाडी मधील 15 घरे व घाटाच्या खालच्या बाजूला मौजे पेढे गावातील कुंभारवाडी मधील 20 घरे, बौद्धवाडी मधील 7 घरे, घरभेवाडीतील 17 घरे, कोष्टेवाडीतील 12 घरे अशा एकूण 71 घरांना चौपदरीकरण कामावेळी व पश्चात कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी. पर्यायी वाहतूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून पोलिस अधीक्षक रत्नागिरी व उपप्रादेशिक वाहन अधिकारी रत्नागिरी यांनी योग्य ते नियोजन करून आवश्यक ते पोलीस चौकी, अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करावी, अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT