Mumbai Goa Highway Kashedi Tunnel Dainik Gomantak
महाराष्ट्र

Kashedi Tunnel: कोकणात जाणाऱ्यांना दिलासा! मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दोन्ही मार्गिकेमधून वाहतूक सुरु

Mumbai Goa Highway Kashedi Tunnel: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीतील दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी सुरु करण्यात आले. यामुळे शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

Manish Jadhav

Mumbai-Goa Highway Kashedi Tunnels Fully Open For Traffic

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीतील दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी सुरु करण्यात आले. यामुळे शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

वीजपुरवठ्यासाठी अनामत रक्कम भरणे

कशेडीतील दोन्ही बोगद्यातील कायमस्वरुपी वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणविभागाकडे विजेची मागणी केली असून त्यासाठी 80 लाखांची रक्कम भरण्यासाठी सूचित करण्यात आले होते. मात्र ही रक्कम भरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने कशेडीतील दोन्ही बोगदे पूर्णक्षमतेने वाहतुकीसाठी (Transport) खुले होतील की नाही याबाबत शंका उपस्थित करण्यातील आली होती.

तात्पुरती सुविधा

शिमगोत्सवासाठी वाढणाऱ्या वाहनांची संख्या पाहता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कशेडीतील दोन्ही बोगद्यात जनरेटरची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दोन्ही बोगद्यातील वीजपुरवठा कार्यन्वित होईपर्यंत विजेचा अडथळा दूर करण्यासाठी तात्पुरती जनरेटरची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT