Mumabi Goa Highway Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर वाणी पेठजवळ एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर पुलावरून थेट खाली कोसळला. या अपघातामुळं टँकरमधून मोठ्या प्रमाणावर गॅसची गळती सुरू झाली.

Sameer Amunekar

रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गावाजवळ आज सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाणी पेठजवळ एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर पुलावरून थेट खाली कोसळला. या अपघातामुळं टँकरमधून मोठ्या प्रमाणावर गॅसची गळती सुरू झाली, ज्यामुळे महामार्गावर भीतीचं वातावरण पसरलं आहे.

अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले. परिस्थितीच्या गांभीर्याचा अंदाज घेत वाणी पेठ परिसरातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहितीमधून समजते, मात्र गॅस गळतीमुळे काही वेळ परिसरात प्रवेश बंद करण्यात आला होता.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प

या अपघाताचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. गेल्या 10 तासांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

महामार्गावर दोन्ही दिशांनी म्हणजेच मुंबईकडून येणारी आणि गोव्याकडे जाणारी अवजड वाहने अडकून पडली आहेत. अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अपघातानंतर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत. छोट्या वाहनांची वाहतूक बाबनदी-पाली मार्गे वळवण्यात आली आहे, जेणेकरून वाहनचालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल.

मात्र, अवजड वाहनांसाठी सध्या कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने ही वाहने महामार्गावरच थांबवण्यात आली आहेत. परिणामी, रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली आहे. प्रशासनाकडून मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Odisha Crime: हॉस्टेलमध्ये झोपलेल्या 8 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले 'फेव्हिक्विक', वर्गमित्रांच्या कृत्यानं उडाला थरकाप

Hardik Pandya Record: भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात हार्दिक पांड्या रचणार इतिहास, चहलचा विक्रम धोक्यात; फक्त एवढी कामगिरी केली की झालं…

मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर शेक् रेस्टॉरंट; पर्यटन खात्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

TVS Jupiter: खास तुमच्यासाठी! दमदार इंजिन, स्टायलिश लूक आणि आधुनिक फीचर्ससह 'टीव्हीएस जुपिटर'चे नवे मॉडेल लॉन्च

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

SCROLL FOR NEXT