Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम होणार पूर्ण; बांधकाममंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

Mumbai-Goa Highway Construction Update: मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुंबई-गोवा महामार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी बांधकाममंत्र्यांनी सांगितले.

Manish Jadhav

Mumbai Goa Highway to be Completed Before Ganeshotsav

Mumbai Goa Highway: तुम्ही मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे खुद्द महाराष्ट्र राज्याचे बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी सांगितले. गुरुवारी (20 फेब्रुवारी) बांधकाममंत्र्यांनी महामार्गाची पाहणी केली. मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुंबई-गोवा महामार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी बांधकाममंत्र्यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गाचा पहिला पाहणी दौरा

दरम्यान, बांधकाम खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर शिवेंद्रसिंह भोसले यांनी पहिल्यांदाच मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. गुरुवारी दुपारी साधारण 12.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी पनवेल पळस्पा फाटा येथून महामार्गाचा पाहणी दौरा सुरु केला. यावेळी बोलताना बांधकाममंत्र्यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून युद्धपातळीवर ते पूर्ण केले जात आहे. मी मान्य करतो की, काही ठिकाणी कामे अपूर्ण असल्यामुळे कोकणवासीयांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु

मागील काही महिन्यांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai-Goa Highway) काम वेगाने सुरु आहे. एकूण 12 टप्प्यांत हा महामार्ग विकसित करण्यात येत आहे. तीन टप्पे वगळता इतर ठिकाणची कामे पावसाळ्यापूर्वीच मार्गी लागणार आहेत. त्यांमुळे यंदाच्या गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होणार नाही.

दुसरीकडे मात्र, कासू ते इंदापूर, इंदापूर-वडपाले आणि आरवली-कांटे या तीन टप्प्यांतील काम रखडण्याची शक्यता आहे. या भागात संथगतीने कामे सुरु आहेत. याचाच आढावा घेण्यासाठी बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी गुरुवारी पाहणी दौरा केला. या महामार्गाचे काही काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तर काही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. त्यामुळे रखडलेल्या कामासंदर्भात दोन्ही विभाग समन्वय साधून कामे करत आहेत. .

गणेशोत्सवापूर्वी काम मार्गी लागणार

बांधकाममंत्री पुढे बोलताना सांगितले की, गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करणयासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. कोकणवासीयांना महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे मी समजू शकतो. राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग समन्वयातून महामार्गाचे काम पूर्ण करत आहेत.

राज्याचे रोजगारमंत्री भरत गोगावले काय म्हणाले?

बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी केल्यानंतर राज्याचे रोजगारमंत्री आणि शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना गोगावले म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाचे लवकरात-लवकर पूर्ण होईल याची मला खात्री आहे. खुद्ध बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी महामार्गाच्या कामांचा आढावा घेतला. त्यांना आम्हीही महामार्गाच्या बाबतीत काही गोष्टी सांगितल्या आहेत. महामार्गाच्या कामांवरुन आम्ही आतापर्यंत आम्ही शिव्या खाल्या आहेत. आता तुम्ही आमच्या शिव्या कमी करा असेही ते पुढे बोलताना म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT