Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाची किती पाहणी करणार? सरकारच्या उदासीनेतर कोकणवासीयांचा सवाल

Mumbai Goa Highway: कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत.

Manish Jadhav

Mumbai Goa Highway: कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. तर दुसरीकडे, वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्याचे सांगत असतानाच हा मार्ग खड्ड्यात गेला आहे. पळस्पे ते नागोठणे या मार्गाचे काम पुन्हा एकदा सुरु केल्याने मार्गात खड्डे तयार झालेत. यामुळे स्थानिकांसह वाहनचालकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. अजित पवार गटाचे विद्यमान खासदार आणि माजी मंत्री सुनिल तटकरे आणि शिंदे सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या मार्गाने प्रवास करतात. तरीही ते महामार्गाची पाहणी करत असल्याने किती वेळा महामार्गाची पाहणी करणार? असा प्रश्न कोकणवासी करु लागले आहेत.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्ग हा कोकण आणि गोव्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. दुहेरी वाहतूक असलेल्या या मार्गावर हजारो लोकांचा अपघातामुळे जीव गेल्यानंतर सरकारला जाग आली. त्यानंतर महामार्गाचे चौपदीकरणाचा ठराव पास करुन काम करण्याचे हाती घेण्यात आले. मात्र कोकणाच्या बाबतीत सरकारची उदासीनता दिसून आलीय. एकीकडे देशभरातील महामार्गांचे काम वेळेत पूर्ण होत असताना मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरण तब्बल 12 वर्षे उलटूनही पूर्ण होऊ शकले नाही.

दुसरीकडे, सरकारकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात नियोजनाचा अभाव राहिला. पहिल्या टप्प्यात झालेल्या कामाचा सगळ्यांनाच मोठा फटका बसला. तर दुसऱ्या टप्प्यातील काम देखील कॉंक्रिटमुळे केले जात असल्याने त्याला वेळ लागला. त्यामध्येही कॉंक्रिट कामाची गुणवत्ता नसल्याने महामार्गावरुन प्रवास करणारे या कामावर नाराज आहेत. पळस्पे- इंदापूर आधी डांबरीचे काम करण्यात आले होते, मात्र त्यानंतर कामाचा बोजवारा उडाल्याने हा टप्पा कॉंक्रिटमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. कामाला सुरुवात झाली असली तरी सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मार्गावर मोठे खड्डे पडल्याने रस्ता दिसेनासा झाला आहे. कशेडी घाटातील भोगदा, पुढे परशुराम घाट, आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात कामे अर्धवट आहेत. यामुळे हा महामार्ग आजही असुरक्षित आहे.

राजकीय उदासीनता

आज प्रत्येक राजकीय पक्षात कोकणातील अनेक बडे नेते मोठ्या पदावर आहेत. मात्र कोकणातील प्रश्नांवर मात्र त्यांची उदासीनता स्पष्ट दिसते. ते कधीच एकत्र आले नाहीत. अजित पवार गटाचे रायगडचे विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांच्या राज्यमंत्रीपदापासून या महामार्गाचे काम सुरु आहे. याच मुंबई-गोवा महामार्गाने खासदार नारायण राणे, सुनिल तटकरे, शिंदे सरकारमधील मंत्री सुनिल तटकरे, मंत्री उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण प्रवास करतात. तरीही त्यांच्याकडून सातत्याने महामार्गाची पाहणी केली जाते. म्हणूनच आता किती वेळा या महामार्गाची पाहणी करणार असा सवाल आता कोकणवीस करु लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT