Accident on Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा मार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 9 ठार

मुंबई-गोवा मार्गावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Accident on Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर रायगडजवळील रेपोली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात आज सकाळी 5 च्या सुमारास घडला.

या आपघातामुळे मुंबई-गोवा (Mumbai-Goa) मार्गावरची वाहतूक ही ठप्प झाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृत व्यक्ति हे कुठले आहेत हे अद्याप माहिती मिळाली नाही. पण या अपघात एक मुलगा बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना आज सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर घडली. कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात कारमधील 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच, या अपघातात चार वर्षांचा चिमुकला बचावल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून गाडीतून प्रवास करणाऱ्या नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहेत. या अपघातात 4 वर्षाचं लहान मुल बचावला असून त्याच्यावर माणगाव येथीस सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे

  • खोळंबलेली वाहतूक पूर्ववत

या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करुन वाहतूक सुरळीत केली. तसेच, अपघातात दगावलेल्या व्यक्ती नेमक्या कुठच्या होत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation: आरक्षणावरून 'एसटी' आक्रमक, दोन दिवसांत पुढील भूमिका ठरणार; चळवळीचे नेतृत्व पुन्हा प्रकाश वेळीप यांच्याकडे

Karnataka Tourist Death Case: मी झोपेच्या गोळ्या संदीपला दिल्या हे खरं, पण..., अक्षताची पोलिसांसमोर स्पष्ट कबुली, खुनाचा गुन्हा नोंद

VIDEO: 'आता सर्व काही संपलं...' ब्राझीलच्या पराभवानंतर नेमार रडला; 80 गोलांसह आंतरराष्ट्रीय फुटबॉलला भावनिक निरोप!

Horoscope: सोमवार ठरणार खास! भगवान शंकराच्या कृपेने 'या' राशींचे चमकणार नशीब; धनलाभ, पदोन्नती आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याचे संकेत

गोरेपणाच्या मोहात आरोग्य धोक्यात? नागपुरातील 18 महिलांना किडनीचा त्रास; 'Made in Pakistan' फेअरनेस क्रीमवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT